चार महिन्यांत तिसºयांदा भिजली खताची पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:35 AM2017-09-25T00:35:07+5:302017-09-25T00:35:07+5:30

रेल्वेस्टेशन मालधक्क्यावरील खताची पोती दरवर्षी पावसाळ्यात भिजत आहेत. गेल्या चार महिन्यांत तिसºयांदा खताची पोती भिजली.

Fertilizers stock damaged again in rains | चार महिन्यांत तिसºयांदा भिजली खताची पोती

चार महिन्यांत तिसºयांदा भिजली खताची पोती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन मालधक्क्यावरील खताची पोती दरवर्षी पावसाळ्यात भिजत आहेत. गेल्या चार महिन्यांत तिसºयांदा खताची पोती भिजली.
मालधक्क्यावर शेडची अपुरी सुविधा आहे. उघड्यावर खत उतरविल्यानंतर त्यांची काळजी घेण्याकडे माल वाहतूकदार दुर्लक्ष करतात. त्यामुळे खत भिजण्याचा फटका शेतकºयांना बसतो.
शहरात बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसात मालधक्क्यावर युरिया खताची शेकडो पोती भिजली. दोन मालगाड्यांद्वारे अनुक्रमे २५०० आणि १८०० टन युरियाची पोती मालधक्क्यावर आली होती. पावसाचा अंदाज असूनही पोती ताडपत्रीने झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सायंकाळी पावसाला सुरुवात होताच अनेक पोती पाण्यात भिजली. गुरुवारी सकाळपर्यंत अनेक पोती उघडीच पडून होती. पावसामुळे खतांची झालेली दुरवस्था स्पष्ट दिसत होती. खत भिजल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहे; परंतु रेल्वे प्रशासन आणि माल वाहतूकदार यातून कोणताही धडा घ्यायला तयार नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही.
शेड वाढवा
मालधक्क्यावर आजघडीला केवळ ११ मालडब्यांच्या क्षमतेचे शेड आहे. प्रत्यक्षात ४२ मालडबे येतात. त्यामुळे शेड वाढविण्याची मागणी होत आहे. मालगाडीत माल ठेवल्यास शुल्क द्यावे लागते. रेल्वे आल्यानंतर ९ तासांच्या आत माल उतरवून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक पोत्यासाठी प्रतितास १५० रुपये आकारले जातात. हे शुल्क वाचविण्यासाठी उघड्यावर माल उतरविला जात असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Fertilizers stock damaged again in rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.