राजाबाजार मंदिरात आजपासून पर्युषण पर्व
By Admin | Published: September 6, 2016 01:01 AM2016-09-06T01:01:59+5:302016-09-06T01:07:14+5:30
औरंगाबाद : खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार येथे ६ ते १५ सप्टेंबरदरम्यान पर्युषण पर्व महामहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार येथे ६ ते १५ सप्टेंबरदरम्यान पर्युषण पर्व महामहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजाबाजार येथील जैन मंदिरात ६ रोजी सकाळी धर्मध्वजारोहणाने पर्युषण पर्वास प्रारंभ होईल. पंचमेरुची स्थापना करण्यात येईल. या पर्वात येणाऱ्या उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन, ब्रह्मचर्य या विषयांवर आचार्यश्रींचे दररोज प्रवचन होणार आहे. सकाळी ८.३० वाजता भगवंतांचा अभिषेक, पूजा, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजेदरम्यान चंद्रसागर धर्मशाळा येथे रत्नत्रय श्रावक संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता भगवंतांची आरती होणार आहे. ७ रोजी सुमतीसागर महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्णपुरा येथे चरणाभिषेक होणार आहे. ९ रोजी मोक्षकल्याणक महोत्सवानिमित्त निर्वाण लाडू चढविण्यात येणार आहे. ११ रोजी शहरात प्रथमच तीस चोबीसी विधानाचे प्रमुख इंद्र- इंद्राणीची निवड तसेच धूप दशमीनिमित्त भगवंताला धूप व चादर चढविण्याचा कार्यक्रम. १२ रोजी सुपार्श्वसागर महाराजांचा स्मृतिदिन, १३ रोजी कांजीबारसचा प्रारंभ, १४ रोजी रत्नत्रय व्रत प्रारंभ. १५ रोजी भगवान वासुपूज्य मोक्षकल्याणक निर्वाण लाडू. १७ रोजी क्षमावलीनिमित्त आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांच्या सान्निध्यात सायंकाळी ७ वाजता क्षमावलीचा कार्यक्रम. १८ रोजी पाडव्यानिमित्त सकाळी राजाबाजार येथून शोभायात्रा. यानंतर चंद्रसागर जैन धर्मशाळा येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्युषण पर्व यशस्वीतेसाठी पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी, अशोक अजमेरा, डॉ. रमेश बडजाते, दिलीप कासलीवाल, विनोद लोहाडे यांच्यासह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
विविध जैन मंदिरांत धार्मिक कार्यक्रम
पर्युषण पर्वानिमित्त अरिहंतनगर येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात कुलभूषणमती माताजी यांच्या मार्गदर्शनात दररोज सकाळी ७.३० वाजता भगवंतांचा अभिषेक होईल. तसेच बालाजीनगर, हडको, रामनगर, आर्यनंदी कॉलनी, शांतीनाथ हौ. सो. चाणक्यपुरी, मोहनलालनगर, चिंतामणी कॉलनी, चिंतामणी रेसिडेन्सी, सर्वतोभद्र पार्श्वनाथ जैन मंदिर, कर्णपुरा येथील जैन मंदिरात सकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे.