महामॅरेथॉन ऑनलाइन नोंदणीसाठी मोजके काही दिवसच शिल्लक
By जयंत कुलकर्णी | Published: December 9, 2023 08:06 PM2023-12-09T20:06:31+5:302023-12-09T20:07:28+5:30
छत्रपती संभाजीनगरात दि. १७ डिसेंबरला विभागीय क्रीडा संकुलवर लोकमत महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात दि. १७ डिसेंबरला विभागीय क्रीडा संकुलवर लोकमत महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे. या महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळत आहे. महामॅरेथॉनच्या ऑनलाइन नोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्क आहेत. त्यामुळे ज्यांनी आपला सहभाग अद्याप निश्चित केला नाही अशांनी आता लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.
विभागीय क्रीडा संकुलावर दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर मराठवाडा व राज्यभरातील धावपटू, नागरिक, युवा आणि युवतींसह नागरिकांनी वैयक्तिक आणि कुटुंबांसह महामॅरेथॉनमध्ये धावण्याचा निर्धार करीत मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली आहे.
लोकमत महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिक, खेळाडू, महिला, युवक आणि युवतींनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महामॅरेथॉनमध्ये ज्यांना धावण्याची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ३ व ५ कि.मी. हे अंतर असणार आहे. तसेच, १२ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ५ कि.मी. अंतराच्या फन रनचा यात समावेश आहे. १६ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे १० कि.मी. पॉवर रनमध्ये सहभागी होऊ शकतात, तर नियमित सराव असणाऱ्या प्रोफेशनल धावपटूंसाठी २१ कि.मी. अंतर असणार आहे.
१२ लाखांपर्यंत बक्षिसे
मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि.मी.मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके. तसेच ३ आणि ५ कि.मी.मधील स्पर्धकांना मिळणार मेडल आणि प्रमाणपत्रे. यंदा होणारी महामॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि.मी. अंतरात होणार आहे.
दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत.
ऑनलाइन नोंदणीसाठी
http://tiny.cc/LokmatAurangabad या लिंकवर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना वैयक्तिक आणि ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३९३१८७३, ८०५५५६२१२१, ७३८७३३३८७८, ८९९९६११९५४ या क्रमांकांवर संपर्क साधा.