रोहित्र जळाल्याने पंधरा दिवसापासून आव्हाना अंधारात

By Admin | Published: August 10, 2014 11:59 PM2014-08-10T23:59:29+5:302014-08-11T00:04:05+5:30

आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना यैथील रोहित्र जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य आहे.

Fifteen days of challenge in the dark due to fire burns | रोहित्र जळाल्याने पंधरा दिवसापासून आव्हाना अंधारात

रोहित्र जळाल्याने पंधरा दिवसापासून आव्हाना अंधारात

googlenewsNext

आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना यैथील रोहित्र जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य आहे. याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ महावितरण विरूद्ध संताप व्यक्त करीत आहे.
गावाची लोक संख्या ७ हजारावर आहे. गावात एकूण तीन रोहित्र आहे. पैकी एक रोहित्र पूर्ण जळाले आहे. त्यामुळे गाव अंधारात आहे. जळालेले रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरणच्या कार्यालयात नेण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकांकडून ५० रूपये प्रमाणे लोकवर्गनी गोळा केली. त्यातून खाजगी वाहन करून जळालेले रोहित्र भोकरदन येथील महावितरणच्या कार्यालयात पाठविले. मात्र अद्यापपर्यंत ते रोहित्र दुरूस्त करून आलेले नाहीत. त्याचा पाठपुरवा कोण करणार म्हणून ग्रामपंचायतनेही कानावर होत ठेवले आहे. खुद्द ग्रामपंचायतच याबाबत उदासिन असल्याने महावितरण व ग्रामपंचायतच्या मध्ये ग्रामस्थ मात्र भरडल्या जात आहेत. मागील १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना पिठाची गिरणी बंद आहे. लोकांना दळणासाठी दुसऱ्या गावी जावे लागत आहे. यापूर्वीही सुमारे २० दिवस रोहित्र जळाल्याने गाव अंधारात होते. त्यावेळी स्वत: पिठाच्या गिरणी मालकाने पुढाकार घेवून रोहित्र बदलून आणले होते. यावेळी कोणी पुढाकार घेत नसल्याने तसेच महावितरणचे अधिकारीही रोहित्र दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Fifteen days of challenge in the dark due to fire burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.