पंधरा डीपींची वीज खंडित
By Admin | Published: November 7, 2014 12:39 AM2014-11-07T00:39:56+5:302014-11-07T00:42:03+5:30
लोहारा : तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून अवैध पाणी उपसा शेतीसाठी सुरुच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली असून,
लोहारा : तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून अवैध पाणी उपसा शेतीसाठी सुरुच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली असून, प्रकल्पाच्या आजु-बाजुला असलेल्या पंधराहून अधिक अधिक डीपीवरील वीजपुरवठा गुरुवारी खंडित केला. यावेळी महसूल, पाटबंधारे, वीज वितरण कंपनीसोबतच पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पावर २२ खेडी माकणी, उमरगा, निलंगा, औसा शहर, तीस खेडी औसा, दहा खेडी मातोळा (ता. औसा) यासह शंभरावर गावचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात मागील वर्षीपासून लोकमंगल माऊली साखर कारखानाही याच प्रकल्पातून पाणी घेत आहे. मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पात सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा मृत असून तो ही ८.४ दसलक्ष घनमिटर इतकाच आहे. त्यामुळे तीन महिन्यासाठीच हे पाणी पिण्यासाठी पुरेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण प्रकल्पा शेजारील शेतकरी अवैधरित्या पाणी उपसा करत होते. याबाबत प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याचे वास्तव ५ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ मांडले होते. यावर प्रशासनाने दोन दिवसात कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार लोकमत’ वृत्ताची दखल घेत आज गुरुवारी तहसील प्रशासन वीज वितरण कंपनी व निम्न तेरणा प्रकल्प व पोलीस यांच्या सहकार्याने माकणी निम्न तेरणा प्रकल्पाच्या आजुबाजुच्या पंधरावर डीपीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. साधारण तीसवर डीपी असून, राहिलेल्या डीपीचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कारवाईत माकणी मंडळ अधिकारी बी. एस. जगताप, तलाठी जगदीश लांडगे, माकणीचे तलाठी डी. एस. कोळी, ए. ए. नळेगावे, ए. पी. बनसोडे, प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता एस. व्ही. देशमुख, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एन. व्ही. देशमुख, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पी. जी. जोगी, डी. आर. गोसावी, पोलीस सरवदे, पानढवळे, बालाजी भूमकर आदी या पथकात सहभागी झाले होते.