पन्नास वर्षांची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:04 AM2017-09-07T01:04:57+5:302017-09-07T01:04:57+5:30
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांच्या दुटप्पीपणामुळे शहरात गणरायाचे मंगळवारीऐवजी बुधवारी विसर्जन करावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांच्या दुटप्पीपणामुळे शहरात गणरायाचे मंगळवारीऐवजी बुधवारी विसर्जन करावे लागले. मागच्या ५० वर्षांत प्रथमच असे झाले.
एका मंडळास डीजे वाजविण्याची परवानगी देण्यात आली; पण दुसºया मंडळाला नाकारल्याने झालेल्या पोलीस व मंडळ पदाधिकाºयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे मंगळवारी श्रींचे विसर्जन न होता बुधवारी तणावपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली. या घटनेमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
जाफराबाद येथे सर्व धर्मांच्या उत्सवांमध्ये कोणतीच अडचण येणार नाही यासाठी पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मात्र, यंदा मंडळाच्या पदाधिकºयांनी विनंती करूनसुद्धा पोलीस प्रशासनाने ऐकून न घेता मंडळाच्या पदाधिकाºयांनाच आरेरावीची भाषा वापरत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी शांतता समितीची बैठक न बोलवता पदाधिकाºयांच्या समस्या समजून न घेता सोयीनुसार कारभार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फोल ठरला. एका मंडळास डीजे वाजविण्याची परवानगी तर दुसºयास परवानगी नाकारल्याचे पाहून गणेश भक्त आणि मंडळाचे पदाधिकाºयांत तीव्र नाराजी दिसून आली. मिरवणूक सुरू असताना परत वेळेच्या आत पूर्ण करा असा पोलिसांचा ससेमिरा सुरूच होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मिरवणूक आपल्या पद्धतीने काढली. रात्रभर शिवाजी चौकात मिरवणूक थांबवून दुसºया दिवशी ही मिरवणूक सकाळी दहा वाजता पुढे सरकली. त्यामुळे ही मिरवणूक ऐतिहासिक ठरली आहे. त्यापूर्वी रात्री विभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, तहसीलदार जे. डी. वळवी यांनी नगराध्यक्ष सऊद शेख, उपनगराध्यक्ष दीपक वाकडे, नगरसेवक वसीम जहागीरदार, रविराज जैस्वाल, अहेमद शेख, सुभाष वाकडे, सुरेश वाकडे, राजू वाकडे, कौसर शेख, मंडळाचे पदाधिकारी मयूर वाकडे, विशाल वाकडे, कैलास दिवटे, सुनील वाकडे, सोमेश लहाने, योगेश वाकडे व ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली. पोलीस अधिकाºयाची बदली करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.