किरकोळ कारणावरून आपसात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:04 AM2021-01-02T04:04:37+5:302021-01-02T04:04:37+5:30

औरंगाबाद : बेकरीजवळ लघुशंका केल्याच्या कारणावरुन चौघांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास नारेगावमधील ...

Fighting for petty reasons | किरकोळ कारणावरून आपसात हाणामारी

किरकोळ कारणावरून आपसात हाणामारी

googlenewsNext

औरंगाबाद : बेकरीजवळ लघुशंका केल्याच्या कारणावरुन चौघांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास नारेगावमधील अजीज कॉलनीत घडली. याविषयी परस्परविरोधी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले.

अझहर महेबूब शेख (३०, रा. आनंद गाढेनगर, नारेगाव) हे पूना बेकरीजवळ लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आलेल्या मोहम्मद अल्फराज मोहम्मद इलियास अन्सारी आणि अन्य एकाने येथे लघुशंका का केली असे म्हणत शिवीगाळ व लाकडी दांड्याने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच अझहर महेबूब शेख यांनी शेख गफार उर्फ बबलू याच्या मदतीने मोहम्मद अल्फराज आणि त्याच्या साथीदाराला मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले.

जुन्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण

औरंगाबाद : रिक्षाच्या धंद्यासाठी चल असे म्हणत घरातून घेऊन गेलेल्या चालकाला चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना २७ डिसेंबर रोजी मध्यरात्री सिल्लेखाना येथे झाली.

पोलिसांनी सांगितले की, सिल्लेखान्यातील एका रिक्षा चालकाच्या घरी मुश्ताक, जाकीर कुरेशी, सज्जू कुरेशी आणि माजीद कुरेशी हे गेले होते. त्यावेळी त्यांनी रिक्षाच्या धंद्यासाठी चल म्हणून त्याला रिक्षाने रॉक्सी थिएटरजवळील सिल्लेखाना झोपडपट्टीत नेले. तेथे त्याला जुन्या वादातून चौघांनी लाकडी दांड्याने मारहाण करुन डोके फोडले. याप्रकरणी रिक्षा चालकाच्या पत्नीने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

जामिनावर सुटलेल्या आरोपीविरुध्द गुन्हा

औरंगाबाद : जामीन मिळाल्यानंतर न्यायालयासमोर जाणूनबुजून हजर न होणाऱ्या आरोपी पेंटरवर पोलिसांनी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविला. चोरीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर विजय वसंत चावरे (४२, रा. जळका खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर) हा २०१७ पासून न्यायालयासमोर हजर राहत नव्हता. त्यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.

दुचाकी जाळली

औरंगाबाद : अपार्टमेंटच्या पार्किंगमधील दुचाकी (एमएच-२०-सीएल-९१९९) माथेफिरुने जाळल्याची घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास सिटीचौकातील रामेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली. याविषयी अपार्टमेंटमधील काही नागरिकांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत दुचाकी अर्धवट अवस्थेत जळाली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार शेख शाहेद करीत आहेत.

Web Title: Fighting for petty reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.