चुकीचा पीक कापणी अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:05 AM2021-05-30T04:05:31+5:302021-05-30T04:05:31+5:30
या तक्रारीवर शेतकरी जगनाथ कुदळ, बाजीराव दुधे, कडूबाई हासे, अशोक कुदळ, पंडित दुधे (रा.सिल्लोड), तसेच भावराव रूपा दुधे, कुशिवार्ताबाई ...
या तक्रारीवर शेतकरी जगनाथ कुदळ, बाजीराव दुधे, कडूबाई हासे, अशोक कुदळ, पंडित दुधे (रा.सिल्लोड), तसेच भावराव रूपा दुधे, कुशिवार्ताबाई दुधे (रा. पाबळवाडी) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या तक्रारीबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी संबंधित अधिकारी व विमा कंपनीवर गुन्हे दाखल केले जातील. तत्पूर्वी कृषी विभागाकडून माहिती मागवून प्रत्यक्ष चौकशी करून हा निर्णय घेतला जाईल.
----
सत्तारांनी दिले निर्देश
कापणी प्रयोगाचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असे निर्देश राज्यमंत्री सत्तार यांनी दिले आहे. त्याचबरोबर, पीक कापणी प्रयोगाचा अहवाल फेरतपासणी करून, शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करा, असेही त्यांनी बैठकीत दिले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे, तहसीलदार विक्रम राजपूत (सिल्लोड), तहसीलदार प्रवीण पांडे (सोयगाव), तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी, एस.बी. पवार, एचडीएफसी आरगो इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी रामनाथ भिंगारे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे ज्ञानेश्वर मातेरे, रवि अकुलवर यांची उपस्थिती होती.