पैसे मागणाऱ्या अधिष्ठाताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:02 PM2020-08-19T19:02:03+5:302020-08-19T19:03:52+5:30

व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले.

File a complaint in the police against the incumbent who demanded money | पैसे मागणाऱ्या अधिष्ठाताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल 

पैसे मागणाऱ्या अधिष्ठाताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठातील संवैधानिक पदावरील सर्व नियुक्त्यांची चौकशी करण्याची मागणीसर्वपक्षीय विद्यार्थी संघटनाही आक्रमक

औरंगाबाद : पीएच.डी.चा व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने  बेगमपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठाकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले. 

व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले.  डॉ. अमृतकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ बचाव कृती समितीच्या शिष्ठमंडळाने मंगळवारी पुन्हा कुलगुरूंची भेट घेतली. विद्यापीठाची  बदनामी होत असल्यामुळे अधिष्ठातांवर  पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली. कृती समितीची मागणी आणि विद्यार्थी संघटनांच्या आग्रहामुळे कुलगुरूंनी अधिष्ठातांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिल्याचे कृती समिती समन्वयक डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

विद्यापीठातील संवैधानिक पदावरील सर्व नियुक्त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सेवानिवृत न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे डॉ. शंकर अंभोरे यांनी सांगितले. डॉ. फुलचंद सलामपुरे,  डॉ. विलास खंदारे, सुनील मगरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. गोपाल बच्छिरे, डॉ. भास्कर टेकाळे, दादासाहेब गजहंस, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. एस. बी. वाघमारे,         डॉ. अनिल पांडे, दीपक साळुंके, शिवराम म्हस्के, डॉ. गंगाधर मोरे, रमाकांत छडीदार आदी यावेळी उपस्थित होते.


सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनाही आक्रमक
सामाजिक शास्त्राच्या अधिष्ठातांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, बडतर्फीची कारवाई करून संबंधित विद्यार्थ्यांचा व्हायवा तात्काळ घेण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. यावर कुलगुरूंनी येत्या १५ दिवसांत त्या विद्यार्थ्यांचा व्हायवा घेण्याचे आश्वासन विद्यार्थी संघटनांना दिले.  सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेने पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन सादर केले. यावेळी अधिसभा सदस्य अ‍ॅड. विजय सुबुकडे, एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कुणाल खरात, प्रशांत वाघमारे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते नीलेश आंबेवाडीकर, वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे डॉ. किशोर वाघ, रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, अ‍ॅड. अतुल कांबळे, मझर पठाण, अब्दुल रहेमान आलम खान, मोहमीन खान आदींची उपस्थिती होती.
 

Web Title: File a complaint in the police against the incumbent who demanded money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.