ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; भाजपाचे आंदोलन
By Admin | Published: March 18, 2016 01:27 AM2016-03-18T01:27:08+5:302016-03-18T01:55:50+5:30
लातूर / उदगीर / औसा : खा. ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
लातूर / उदगीर / औसा : खा. ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. ओवेसींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.
‘भारतमाता की जय’ म्हणण्यास ओवेसींना लाज वाटते. ‘भारतमाता की जय’ असे मी म्हणणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, स्वाती जाधव, आरेफ सिद्दीकी, अफजल खान, संजय शिंदे, गीता गौड आदींचा समावेश होता. औसा येथेही भाजपा-शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना प्रस्तुत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किरणअप्पा उटगे, तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, सूर्यकांत शिंदे, महावीर कोचेटा, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश भुरे, राजकिरण साठे, महादेव कटके, जगदीश पाटील, बालाजी माने, बाळू नरवडे, बाळासाहेब सोनवळकर, गोविंद खंडागळे, गोपाळ धानुरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू कोद्रे, शरद सोनवळकर, रामदास नरवडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात खा. ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली. ‘भारतमाता की जय म्हणणार नाही,’ असे वक्तव्य करणे म्हणजे देशद्रोह आहे, असे निवेदनात भाजपा-शिवसेनेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)