बनावट मोबाईल विक णाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल

By Admin | Published: July 15, 2017 12:42 AM2017-07-15T00:42:48+5:302017-07-15T00:44:37+5:30

जालना : अ‍ॅपल व बीट्स कंपनीचे बनावट मोबाईल व अन्य साहित्य ग्राहकांना विक्री करणाऱ्या चार मोबाईल दुकानदारांवर शुक्रवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed on shoppers selling fake mobile phones | बनावट मोबाईल विक णाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल

बनावट मोबाईल विक णाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

जालना : अ‍ॅपल व बीट्स कंपनीचे बनावट मोबाईल व अन्य साहित्य ग्राहकांना विक्री करणाऱ्या चार मोबाईल दुकानदारांवर शुक्रवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात युनायटेड ओव्हरसीज रेडमार्क कंपनीत कॉपीराईट अधिकारी म्हणून काम करणारे कुंदनसिंग किहाटे यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील मोबाईल विक्रेते किसनराम चौधरी, सावलराम चौधरी, गोपाराम राजपुरोहित, सुरेश राजपुरोहित, जिवाराम चौधरी, पद्माराम चौधरी यांनी अ‍ॅपल आयफोन व बीट्स मोबाईल कंपनीच्या नावाने बनावट मोबाईल, हेडफोन, चार्जर व अन्य साहित्य ग्राहकांना विक्री करताना आढळले, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास सहायक फौजदार पाटील करीत आहेत.

Web Title: Filed on shoppers selling fake mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.