रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 09:38 PM2019-02-05T21:38:21+5:302019-02-05T21:38:30+5:30

दोन प्रवाशांना जखमी करणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed under rickshaw driver | रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

वाळूज महानगर : निष्काळजीपणे वाहन चालवून समोरच्या वाहनाला धडक देत दोन प्रवाशांना जखमी करणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दीपाली धांडे व शीतल धांडे (रा. अविनाश कॉलनी, वाळूज) या २४ जानेवारी रोजी सायंकाळी वाळूज येथून रिक्षाने (एमएच-२०, ईएफ - १७६६) रांजणगाव मार्गे बजाजनगर येथे कार्यक्रमाला जात होत्या. पावणे सहा वाजेच्या दरम्यान स्टरलाईट कंपनीकडून साई मंदिराकडे जाणाºया टेम्पोला रिक्षा चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. यात दिपाली व शीतल या जखमी झाल्या. त्यांना नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, महेश धांडे यांच्या तक्रारीवरुन रिक्षा चालका विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Filed under rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.