डिघोळच्या सरपंच व उपसरपंचा विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:20 PM2017-07-24T16:20:35+5:302017-07-24T16:20:35+5:30

सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील शिवसेनेच्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात आज अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.

Filing a no-confidence motion against the sarpanch and equipment of the bath | डिघोळच्या सरपंच व उपसरपंचा विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

डिघोळच्या सरपंच व उपसरपंचा विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

परभणी/सोनपेठ : सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील शिवसेनेच्या सरपंच व उपसरपंच यांच्या  विरोधात आज  अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.

मौजे डिघोळ येथील ग्रामपंचायत १३ सदस्यांची आहे. यात  शिवसेनेचे  सात व राष्ट्रवादीचे सहा सदस्य निवडून आले होते. शिवसेनेने यावेळी सत्ता स्थापना केली. परंतु; आता सत्ताधारी गटाच्या तीन व विरोधी गटाच्या सहा अशा नऊ सदस्यांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काम करतात, कराचा व जमा खर्चाचा हिशोब ठेवत नाहीत, स्वच्छता, पथदिव्यांची देखभालीकडे दुर्लक्ष अशा विविध कारणांनी तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
 
सरपंच रमेश सुर्यकांत इंदुरकर व उपसरपंच द्रोपदाबाई बंडू कणसे यांच्याविरोधातातील या अविश्वास प्रस्तावावर   ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन सोमवारी (दि. 31) दु. २  वाजता ग्रामपंचायत कार्यालयात केले आहे.  या अविश्वास प्रस्तावावर गोकुळदास आरबाड,सुनिल खंदारे,कोंडिबा काळभार,आर्चना चव्हाण, मैनाबाई शिंदे, मालनबाई जाधव,गजराबाई गायकवाड,रूकसाना शेख व शांताबाई नरहारे या ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्ष-या आहेत.
 

Web Title: Filing a no-confidence motion against the sarpanch and equipment of the bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.