२५ लाख भरा, अन्यथा फिर्याद

By Admin | Published: January 16, 2015 12:48 AM2015-01-16T00:48:29+5:302015-01-16T01:10:16+5:30

बीड : तालुक्यातील उमरद जहांगिर ग्रामपंचायतीअंतर्गत चार पाणीयोजना रबविण्यात आल्या़ त्यापैकी तीन योजनांचा २५ लाख इतका निधी समितीकडे आहे़ निधी बँक खात्यात जमा करा,

Fill up to 2.5 million, otherwise the prosecution | २५ लाख भरा, अन्यथा फिर्याद

२५ लाख भरा, अन्यथा फिर्याद

googlenewsNext


बीड : तालुक्यातील उमरद जहांगिर ग्रामपंचायतीअंतर्गत चार पाणीयोजना रबविण्यात आल्या़ त्यापैकी तीन योजनांचा २५ लाख इतका निधी समितीकडे आहे़ निधी बँक खात्यात जमा करा, अन्यथा गुन्हा नोंदविण्याची तंबी जि़प़ ने समितीला दिली आहे़
उमरदमध्ये २००८- ०९ मध्ये राबविलेली योजना पूर्ण आहे़ २०११- १२ मध्ये गोरेवस्तीवर एक व भिल्ल वस्तीसाठी दोन योजना मंजूर झाल्या;पण समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी योजनेसाठी आलेल्या एकूण निधीपैकी सुमारे २५ लाख ४१ हजार ७६८ रुपये इतकी रक्कम खात्यातून उचलली़ तक्रारी आल्यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ व्ही़ चव्हाण यांनी १२ जानेवारी रोजी पाहणी केली होती़
विनायक मेटे भेटले सीईओंना
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी गुरुवारी दुपारी दीड वाजता सीईओ नामदेव ननावरे यांची जि़प़ मध्ये भेट घेतली़ यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, सुहास पाटील, अशोक लोढा आदी उपस्थित होते़ पाणी योजनांसह दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Fill up to 2.5 million, otherwise the prosecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.