मास्क विना भरतोय आठवडे बाजार
By | Published: December 5, 2020 04:07 AM2020-12-05T04:07:16+5:302020-12-05T04:07:16+5:30
औरंगाबाद : आठवडे बाजारातून मास्क गायब झाले आहेत. चिकलठाणातील शुक्रवारच्या आठवडे बाजारात ४४८ विक्रेत्यांपैकीं अवघ्या ३४ विक्रेत्यांनी मास्क ...
औरंगाबाद : आठवडे बाजारातून मास्क गायब झाले आहेत. चिकलठाणातील शुक्रवारच्या आठवडे बाजारात ४४८ विक्रेत्यांपैकीं अवघ्या ३४ विक्रेत्यांनी मास्क लावले होते. ग्राहक ही विना मास्क फिरत होते. महापालिकेचे पथकही इकडे फिरकले नाहीत.
जिल्हा प्रशासनाने काही खबरदारी घेण्याच्या अट घालून आठवडे बाजार भरविण्यास परवानगी दिली. विक्रेत्यांनी मास्क लावणे, दोन विक्रेत्यामध्ये अंतर ठेवणे. या नियमाचा जणू काही विक्रेत्यांना विसर पडल्याचे आज चिकलठाण्यातील शुक्रवारच्या आठवडे बाजारात जाणवले. गेटबाहेर फळाच्या हातगाड्या घेऊन उभे असलेले विक्रेत्यांनी मास्क लावले होते. मात्र, आठवडे बाजारात प्रवेश केला की, बहुतांश विक्रेते विना मास्क दिसून आले. ४४८ पैकी ३४ विक्रेत्यांनीच मास्क लावलेले आढळून आले. त्यात काहींनी मास्क ऐवजी उपरणे लावले होते. महिला ही विना मास्क भाजीपाला विक्रेते होत्या. येथे येत असलेल्या ग्राहकांपैकी फक्त ३० टक्के ग्राहक मास्क लावलेले दिसून आले. मास्क लावणाऱ्या ग्राहकांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. दिवसभरात हजारो ग्राहक येतात. मात्र, मास्क लावणाऱ्याचे प्रमाण कमी दिसून आले.
चौकट
मनपाचे पथक दिसलेच नाही
विना मास्क फिरणाऱ्यावर व विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी मनपाने पथक तयार केले आहे. हे पथक आठवडे बाजारात दिसून आलेच नाही.
कॅप्शन
चिकलठाण्यात शुक्रवारी भरविण्यात आलेला आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहक विना मास्क आढळून आले.