दिग्गजांच्या मांदियाळीत रंगणार चित्रपट महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 06:43 PM2018-03-23T18:43:28+5:302018-03-23T18:50:39+5:30
विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले तर त्यांची प्रतिभा कलेचा किती उत्तम आविष्कार सादर करू शकते, हे दि. २४ मार्च रोजी होणार्या लिटिल एंजल इंग्लिश स्कूल, लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब, शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार असून, विद्यार्थ्यांसोबतच आता त्यांच्या पालकांमध्येही याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
औरंगाबाद : विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले तर त्यांची प्रतिभा कलेचा किती उत्तम आविष्कार सादर करू शकते, हे दि. २४ मार्च रोजी होणार्या लिटिल एंजल इंग्लिश स्कूल, लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब, शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार असून, विद्यार्थ्यांसोबतच आता त्यांच्या पालकांमध्येही याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकमत लॉन्स येथे सायं. ६ वा. रंगणार्या या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बालदिग्दर्शक आणि बालअभिनेत्यांची जय्यत तयारी सुरू आहे. ‘बकेट लिस्ट’ या आगामी मराठी चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक तथा निर्माते तेजस प्रभा विजय देऊस्कर, निर्माते अशोक सुभेदार, अभिनेता मंगेश देसाई या दिग्गजांची प्रमुख उपस्थिती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण असेल.
एक साधा मेकॅनिक ते निर्माता, असा अशोक सुभेदार यांचा भन्नाट प्रवास भल्याभल्यांना थक्क करणारा आहे. अमराठी लोक येऊन मराठी चित्रपट करतात आणि बाजी मारून जातात, मग मराठी माणसाने मागे का राहावे, या विचारातून हा अवलिया निर्मिती क्षेत्राकडे वळला आणि ‘बकेट लिस्ट’सारखा चित्रपट रसिकांपुढे ठेवला. ‘कलाकार’, ‘बच्चों का खेल’, ‘सुनहरी राख’, ‘सांज’ यासारख्या लघुचित्रपटांचे दिग्दर्शक तसेच विविध नामांकित पुरस्कार सोहळ्यातून सर्वाेत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक तेजस यांचा प्रवास जाणून घेण्याची संधीही या कार्यक्रमातून मिळेल. ‘एक अलबेला’, ‘खेळ मांडला’ यासारख्या मराठी चित्रपटांमधून अभिनय कौशल्य दाखवून देणारा मंगेश देसाई औरंगाबादकरांचा विशेष लाडका आहे. मंगेश या माध्यमातून बालकलाकारांशी हितगुज करतील.
गिटार अॅण्ड गिग्ज हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. आकाश फाऊंडेशन हे एज्युकेशन पार्टनर, मित्तल आॅप्टिकल्स हे आय केअर पार्टनर, एसएसप्रो हे साऊंड अॅण्ड लाईट पार्टनर, रेडिओ मिर्ची हे रेडिओ पार्टनर, दि अल्ट्रा आऊटडोअर हे आऊटडोअर पार्टनर, दि नुक्कड इट ट्रीट हे फूड पार्टनर, प्रोझोन हे मॉल पार्टनर, अंजली टेम्प्लेस एलएलपी हे ट्रॉफी पार्टनर, लाईमलाईट आणि प्रज्ञाचित्र क्रिएशन्स हे तांत्रिक सहायक आहेत. सर्व स्पर्धक, कॅम्पस क्लबचे सदस्य, शिक्षक, पालक, मित्र परिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.
आनंददायी गोष्ट
लोकमत परिवारासोबत काम करणे ही आमच्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात कलागुण असतात. आपल्याला ते फक्त शोधून काढावे लागतात, त्यांना वाव द्यावा लागतो. फिल्म फेस्टिव्हल सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
- योगिता शास्त्री, लिटिल एंजल इंग्लिश स्कूल
कौतुकास्पद उपक्रम
लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने हा कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बालवयातच अभिनय, दिग्दर्शनाची संधी मिळत आहे. बालकांसाठी राबविण्यात येणार्या अशा उपक्रमांना आम्ही नेहमीच सहकार्य करू.
- मो. अर्शद, सेंटर हेड, प्रोझोन
नवनिर्मितीला वाव देणारा उपक्रम
अशा प्रकारच्या स्पर्धेचे शालेय स्तरावर पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. नवनिर्मितीला वाव देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
- सॅम, गिटार अॅण्ड गिग्ज - प्ले ८
अद्वितीय सोहळा
आमच्या एस. एस. प्रो. कंपनीद्वारे या सोहळ्यासाठी ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे. आजवर आम्ही लोकमत परिवारासोबत विविध कार्यक्रम केलेले आहेत. आता बालक लाकारांसाठी असणारा हा सोहळा खरोखरच अद्वितीय आहे.
- प्रीतम, एस. एस. प्रो.