अखेर जळगाव रोड घेणार मोकळा श्वास; हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:45 PM2023-02-13T12:45:05+5:302023-02-13T12:45:41+5:30

हर्सूल गावात येणारा व गावातून सावंगीकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

Finally, Aurangabad-Jalgaon road will breathe freely; demolution begins in Hersul, traffic will be closed for 4 days | अखेर जळगाव रोड घेणार मोकळा श्वास; हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार 

अखेर जळगाव रोड घेणार मोकळा श्वास; हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार 

googlenewsNext

औरंगाबाद : शहर ते सिल्लोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आज सकाळपासून हर्सूल येथील संपादित मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे हर्सूल गावातून वाहतूक चार दिवस बंद करण्यात आली आहे. 

हर्सूल गावातील संपादित होणाऱ्या मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीला जी २० च्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार सोमवार (दि. १३) ते गुरुवारपर्यंत चार दिवस भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, आज सकाळी गावातील मालमत्ता पाडापाडीचे काम सुरु झाले आहे. काही बाधित मालमत्ता मधील सामान नागरिकांनी स्वतःहून रविवारी काढून घेतले.

चार दिवस वाहतूक राहणार बंद 
हर्सूल गावात येणारा व गावातून सावंगीकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. शहरातून हर्सूल गावातून फुलंब्रीकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉईंटवरून आंबेडकरनगर चौक ते पिसादेवी बायपास अशी पुढे जाईल. फुलंब्री, सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी वाहतूक सावंगी नाका येथून वळवून सावंगी बायपास मार्गे नारेगाव, वोखार्ड टी अशी पुढे जाईल. या सूचना अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांसाठी लागू असणार नाहीत, असे सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेश मयेकर यांनी कळविले आहे.

गजानन महाराज मंदिर चौकातही बदल
गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त (दि.१३) भाविक मोठ्या संख्येने गजानन महाराज मंदिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता ते १३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत गजानन महाराज मंदिर चौक ते हेडगेवार हॉस्पिटल चौक हा रस्ता वाहनांच्या प्रवेशासाठी बंद असणार आहे. या मार्गावर येणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक जे.बी. शेवाळे यांनी केले आहे.

Web Title: Finally, Aurangabad-Jalgaon road will breathe freely; demolution begins in Hersul, traffic will be closed for 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.