अखेर पैठण रस्त्याचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2016 12:37 AM2016-10-04T00:37:06+5:302016-10-04T00:54:06+5:30
बिडकीन : औरंगाबाद- पैठण राज्य रस्त्याचे काम दर्जेदार करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री रामदास कदम यांनी
बिडकीन : औरंगाबाद- पैठण राज्य रस्त्याचे काम दर्जेदार करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री रामदास कदम यांनी औरंगाबाद- पैठण रस्त्याच्या नूतनीकरण भूमिपूजनप्रसंगी संबंधितांना दिला.
अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणीत अडकलेल्या या कामाला अखेर सोमवारी मुहूर्त लागला. कार्यक्रमास खा. चंद्रकांत खैरे, खा. राजकुमार धूत, आ. संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर त्र्यंबक तुपे, सरपंच अशोक धर्मे, तालुकाप्रमुख अण्णाभाऊ लबडे, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब टेके, अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, महिला आघाडीच्या पुष्पा गव्हाणे, ठकूबाई कोथिंबिरे, संजय दौंडे, उपअभियंता एन. जी. वैष्णव, बी. बी. जायभाये, बद्रीनाथ कळसकर, सिराजभाई चारनिया आदींची उपस्थिती होती.
पावसाने मराठवाड्याचा पाणी प्रश्न जवळपास मिटला आहे; परंतु सदरील रस्त्याचे काम दर्जेदार केले नाही तर अधिकारी, आमदार आणि ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याकडे आमदारांनीदेखील लक्ष पुरविणे गरजेचे आहे, असेही पालकमंत्री रामदास कदम म्हणाले.
खा. खैरे यांनी सांगितले की, रेल्वेमार्ग पैठणहूनच करण्यात येणार असून, त्यासाठी पालकमंत्री कदम, आ. भुमरे यांच्यासह आम्ही रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना लवकरच भेटू, असेही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युसूफ पठाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता गाडेकर, उपअभियंता वैष्णव, बी. बी. जायभाये, बद्री कळमकर आदींनी प्रयत्न केले.