अखेर औरंगाबादेच्या पीटलाईनचे भूमिपूजन झाले; आता २४ बोगींसाठी हालचाली
By संतोष हिरेमठ | Published: October 3, 2022 07:39 PM2022-10-03T19:39:51+5:302022-10-03T19:40:15+5:30
१० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सूचना
औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर त १६ बोगींची पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, २४ बोगींच्या पीटलाइनची मागणी होत आहे. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित केल्यास जागा होऊ शकते. त्यातून नव्या सुविधा देता येतील. मालधक्का स्थलांतरित करावा की ठेवावा, या संदर्भात उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली.
औरंगाबादेत सोमवारी पीटलाइनच्या कामाच्या पायाभरणीचा समारंभ झाला. यावेळी त्यांनी ही सुचना केली. २ जानेवारीला जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाईन करण्याची मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लावून धरली. अखेर मे महिन्यात औरंगाबादेत १६ बोगींच्या पीटलाईनसाठीही २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु त्यापुढे प्रत्यक्षात पीटलाइन उभारणीला गती मिळत नसल्याची परिस्थिती होती. अखेर सोमवारी पीटलाइनच्या भूमिपूजनाचेही भूमिपूजनही झाले.