अखेर किरकोळ रजा कपातीचा निर्णय
By Admin | Published: April 12, 2016 12:15 AM2016-04-12T00:15:53+5:302016-04-12T00:40:06+5:30
औरंगाबाद : मुंबई येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी विशेष रजेवर गेलेल्या जवळपास दोन हजार शिक्षकांच्या किरकोळ रजा कपात करण्याचा निर्णय
औरंगाबाद : मुंबई येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी विशेष रजेवर गेलेल्या जवळपास दोन हजार शिक्षकांच्या किरकोळ रजा कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाला अखेर घ्यावाच लागला. यासंदर्भात शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांच्या रजांचा तपशील मागवून घेतला आहे.
यासंदर्भात शिक्षण विभागाने आज सोमवारी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र रवाना केले असून, उद्या मंगळवारी दुपारपर्यंत अधिवेशनासाठी विशेष रजा घेऊन मुंबईला गेलेल्या शिक्षकांच्या खात्यावर किती किरकोळ रजा शिल्लक आहेत. काही शिक्षकांच्या किरकोळ रजा संपल्या असतील, तर त्यांच्या सेवापुस्तिकेत देय- अनुज्ञेय रजा शिल्लक आहेत, यासंबंधीचा ताळेबंद केंद्रीय मुख्याध्यापकांना (पान २ वर)