...अखेर शैक्षणिक वेळापत्रक झाले जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:39 AM2017-09-30T00:39:23+5:302017-09-30T00:39:23+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक कॅलेंडर अखेर तयार झाले आहे.

... finally the educational schedule announced | ...अखेर शैक्षणिक वेळापत्रक झाले जाहीर

...अखेर शैक्षणिक वेळापत्रक झाले जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक कॅलेंडर अखेर तयार झाले आहे. पदव्युत्तर प्रवेशाच्या गोंधळामुळे शैक्षणिक वर्ष मध्यात आल्यानंतर कॅलेंडर बदलावे लागले आहे. यात दिवसांची काटछाट करून १८० दिवसांचा कार्यक्रम तयार केल्याचे स्पष्ट झाले.
विद्यापीठाने २४ एप्रिल रोजी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडरला मान्यता दिली होती. हेसुद्धा एक वेळा बदलण्यात आलेले होते. या दुसºयांदा तयार केलेल्या कॅलेंडरमध्ये तिसºयांदा सुधारणा करण्यात आली आहे. ही सुधारणा पदव्युत्तर प्रवेशाच्या गोंधळामुळे करावी लागली. विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या नेतृत्वाखालील समितीने नवीन कॅलेंडर बनविले आहे. या कॅलेंडरनुसार पहिले सत्र नियोजित वेळेनुसार एक महिना ७ दिवस पुढे गेले आहे. यामुळे विद्यापीठाला दिवाळी सुट्या कमी कराव्या लागल्या आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिवाळीच्या सुट्ट्या १६ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर यादरम्यान होत्या. यामध्ये आता बदल होऊन दिवाळीच्या सुट्ट्या १४ ते २८ आॅक्टोबर एवढ्या केल्या आहेत. तर १६ डिसेंबर ते ४ जानेवारी २०१८ दरम्यान प्रथम सत्राच्या परीक्षा होणार आहेत. पहिले सत्र १० जुलै ते ७ जानेवारीदरम्यान असणार आहे. यानंतर दुसºया सत्राला ९ जानेवारी रोजी सुरुवात होईल. ते सत्र ५ मे रोजी संपेल. हे वेळापत्रक तयार करताना समिती सदस्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली आहे. परीक्षांना केवळ आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला. परीक्षा संपल्यानंतर दुसºया दिवसांपासून केवळ तीनच दिवस निकाल जाहीर करण्यासाठी दिले आहेत. दुसºया सत्रातही उत्तरपत्रिका तपासण्यासाठी केवळ तीनच दिवस देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: ... finally the educational schedule announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.