अखेर १०० कोटींचे चार तुकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:45 AM2017-09-29T00:45:35+5:302017-09-29T00:45:35+5:30
शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या निविदांचा घोळ गुरुवारी अखेर संपला आहे. १०० कोटींच्या निधीचे चार तुकडे करून ३१ रस्ते करण्यासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांच्या चार निविदा काढण्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या निविदांचा घोळ गुरुवारी अखेर संपला आहे. १०० कोटींच्या निधीचे चार तुकडे करून ३१ रस्ते करण्यासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांच्या चार निविदा काढण्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे.
उद्या शुक्रवारी उशिरापर्यंत अथवा मंगळवारी रस्त्यांची निविदा आॅनलाइन प्रसिद्ध होण्याची शक्यता मनपाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. शासनाने १०० कोटी देण्याची घोषणा केल्यानंतर पालिकेतील राजकीय वातावरण रस्त्यांच्या वाटाघाटींवरून तापलेले आहे. रस्त्यांच्या निविदांवरून अधिकारी, पदाधिकाºयांत एकमत झाले नव्हते. दोन ते अडीच महिन्यांनंतर रस्त्यांची यादी व डीपीआरला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी शासनाला पत्र पाठवून या कामाच्या किती निविदा काढायच्या यावर अभिप्राय मागविला होता. त्यानंतर महापौर भगवान घडमोडे यांनी चार निविदा काढण्याबाबत मार्गदर्शनासाठी शासनाला पत्र पाठवले. त्यावर गुरुवारी सायंकाळी शासनाने ३१ रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचे नियोजन करून चार निविदा काढण्याबाबत पालिकेला कळविले.