अखेर गायब झालेला ‘हायवा’ सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:29 PM2018-11-16T23:29:56+5:302018-11-16T23:30:02+5:30

वाळूज महानगर: वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकापाठोपाठ गायब झालेल्या दोन हायवा पैकी एक ‘हायवा’चा शोध लावण्यात वाळूज पोलिसांना यश आले आहे. या हायवा चोरीमुळे अडचणीत सापडलेल्या वाळूज पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून हायवा शोधून काढला आहे. वाळूज पोलिसांच्या या ‘चमकदार’ कामगिरीची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

 Finally, the 'Hywa' find out | अखेर गायब झालेला ‘हायवा’ सापडला

अखेर गायब झालेला ‘हायवा’ सापडला

googlenewsNext

दुसऱ्या हायवाचा शोध सुरुच : जळगाव जिल्ह्यातील कोंडापूर परिसरातून हायवा आणला


वाळूज परिसरात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून, विना परवाना वाळूची वाहतूक या भागात खुलेआमपणे सुरु आहे. या वाळूचोरीमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडत असल्यामुळे वाळूमाफियावर लगाम लावण्यासाठी महसुल विभागाने पावले उचचली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदार डॉ. अरुण जºहाड यांच्या पथकाने वाळूज परिसरातील अवैधरित्या सुरु असलेल्या वाळू पट्यावर छापे मारले होते.

या कारवाईत वाळू तस्करीत सहभागी असलेल्या जमीनमालक, वाळूमाफिया, हेरगिरी करणारे आदीसह २३ जणाविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. महसूल विभागाने ४ नोव्हेंबरला वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा (एम.एच.२०, ई.जी.६७१८) पकडून वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केला होता. यानंतर दुसºया दिवशी रात्री वाळूज पोलिस ठाण्यासमोरुन हा हायवा वाळूमाफियांनी पळविला. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश छावणीचे सहायक पोलिस आयुक्त डी.एन.मुंडे यांना दिले होते.
गायब झालेल्या हायवा प्रकरणात सातारा परिसरातील एकाचा सहभाग असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सातारा परिसरातून गोविंद जयराम सोळस याला ताब्यात घेतले.

सोळस याने हायवा मालक दीपक वाघमोडे याच्या सांगण्यावरुन हायवा जळगाव जिल्ह्यात लपवून ठेवल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्तमुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आर.आर.पवार, फौजदार तुषार देवरे, पोकॉ.रवी बहुले, राजु वाघ आदींच्या पथकाने सोळस याला सोबत घेऊन गुरुवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील कोंडापूर येथून हायवा शोधून काढला. तो वाळूजमध्ये आणून लावण्यात आला आहे. हायवा चोरी प्रकरणात सोळस याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याची १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीज रवानगी करण्यात आली.


दुसरा हायवाचा शोध सुरु
दरम्यान, शेंदूरवादा शिवारातून पोलीस पाटील जयराम दुबिले यांच्या ताब्यात असलेला हायवा (एम.एच.२०- सी.टी.९८८९) हा १३ नोव्हेंबरला वाळूमाफियांनी लांबविला होता. आता या हायवाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Web Title:  Finally, the 'Hywa' find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.