अखेर १५० कोटींच्या रस्त्यांची यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:52 AM2017-08-01T00:52:51+5:302017-08-01T00:52:51+5:30

महापौर बापू घडामोडे यांनी सोमवारी तब्बल १५० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाची यादी जाहीर केली

Finally, a list of 150 crores roads is announced | अखेर १५० कोटींच्या रस्त्यांची यादी जाहीर

अखेर १५० कोटींच्या रस्त्यांची यादी जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील मुख्य रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मागील महिन्यात मंजूर केला. एक महिन्यापासून यादी तयार करण्याचा घोळ सुरू होता. अखेर महापौर बापू घडामोडे यांनी सोमवारी तब्बल १५० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाची यादी जाहीर केली. पन्नास कोटी अतिरिक्त खर्च येत असून, त्यासाठी परत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यादी सर्वसमावेशक असून, प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही महापौरांनी सांगितले.
महाराष्टÑ शासनाकडे मागील एक ते दीड वर्षांपासून शहरासाठी १५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार समितीही १५० कोटी रुपयांसाठीच नेमण्यात आली. समितीने १५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. १०० कोटी कमी रस्त्यांचा विकास होत असल्याने आणखी ५० कोटींची त्यात वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त खर्चाचा निधी शासन देईल, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला. १५0 कोटीत शहरातील ५० रस्त्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांची लांबी ५७. ६२ किलोमीटर आहे. सर्व रस्त्यांची यादी आजच जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आली असून, ही यादी लवकरच प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
१५0 कोटी रुपयांच्या रस्त्यांसाठी एकच कंत्राटदार निश्चित करणार का...? या थेट प्रश्नावर बापू घडामोडे यांनी सांगितले की, यासंदर्भातील प्रशासकीय ‘धोरण’अद्याप निश्चित झालेले नाही. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता चांगली राहावी याकडे आमचे लक्ष राहणार असून, गुणवत्तेसंदर्भात कोणतीही ‘तडजोड’होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Finally, a list of 150 crores roads is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.