अखेर पैठण तालुक्यातील जि. प. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत झाले जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:22 AM2018-02-26T00:22:47+5:302018-02-26T00:22:53+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन हे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत; पण प्रशासनाकडून शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी आग्रही राहिले. शिक्षक सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेताच पैठण तालुक्यातील शिक्षकांचे वेतन नुकतेच राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन हे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत; पण प्रशासनाकडून शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी आग्रही राहिले. शिक्षक सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेताच पैठण तालुक्यातील शिक्षकांचे वेतन नुकतेच राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करण्यात आले.
यासंदर्भात शिक्षक सेनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करण्यासाठी जि.प. प्रशासनाला निवेदने दिली. धरणे आंदोलने केली होती. गेल्या आठवड्यात पैठण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अफजाना खान यांना शिक्षक सेनेच्या तालुका पदाधिकाºयांनी यासंबंधीचे निवेदन सादर केले होते. निवेदनाची दखल घेत गटशिक्षणाधिकारी खान यांनी जानेवारी महिन्याचे वेतन शिक्षकांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यावर जमा केले. यापुढे प्रत्येक महिन्याचे वेतनही अशाच पद्धतीने राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याची ग्वाही संघटनेच्या पदाधिकाºयांना दिली.
आतापर्यंत गटविकास अधिकाºयांच्याकडून गटशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाºयांच्याकडून केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्रीय मुख्याध्यापकांकडून शालेय मुख्याध्यापक व शेवटी मुख्याध्यापकांकडून शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होत असे. वेतन जमा करण्याच्या या शृंखलेचा प्रवास दीर्घकाळ चालत असल्यामुळे वेतनाला दिरंगाई होत असे. अनेक वेळा पगार घेण्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून सहकारी बँकेत हेलपाटे मारावे लागत होते. आता गटशिक्षणाधिकाºयांकडून थेट शिक्षकांच्याच बँक खात्यात वेतन जमा झाल्यामुळे मोठा त्रास कमी झाला असून शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख अमोल एरंडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, कैलास मिसाळ, पांडुरंग गोर्डे, अमोलराज शेळके, शिवाजी दुधे, देवीदास फुंदे, गजानन नेहाले, रामभाऊ हंडाळ, लक्ष्मणराव गलांडे, श्रीकांत गमे, रऊफ पटेल आदींनी गटशिक्षणाधिकाºयांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.