अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 02:40 PM2022-08-10T14:40:35+5:302022-08-10T15:18:51+5:30

मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती.

Finally, Parali-Miraj railway will run again; Inconvenience of devotees and passengers will be avoided | अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार

अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार

googlenewsNext

 - संजय खाकरे
परळी (बीड):
प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज-परळी एक्स्प्रेस रेल्वे गाडी १५ ऑगस्टपासून आणि परळी-मिरज एक्स्प्रेस १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज धावणाऱ्या या रेल्वेमुळे विशेषतः परळी व पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. 

परळी रेल्वे स्टेशनहून सध्या 15 रेल्वे गाड्या धावत आहेत. आता परळी -मिरज गाडीची त्यात भर पडणार आहे. मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ती तब्बल दोन वर्ष पाच महिन्यानंतर सुरू होत आहे. ही रेल्वे गाडी सर्वांसाठी सोयीची असल्याने परळी रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. 
परळी-मिरज ही रेल्वे गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. परळी -मिरज रेल्वे परळीहून पूर्ववत सुरू करावी याकरिता लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना, परळीचे चंदूलाल बियाणी, प्रा राम बांगड, सूर्यकांत ताटे, रामेश्वर महाराज कोकाटे व सत्यनारायण दुबे यांनी यांनी खा. प्रीतम मुंडे, पुणेचे खा. गिरीश बापट, रेल्वेचे अधिकारी उदय भगरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा केला होता

अशी धावेल रेल्वे
रेल्वे क्रमांक 11412  ही 15 ऑगस्टपासून 21.00 वाजता मिरजहून सुटेल आणि 06.10 वाजता परळीला पोहोचेल आणि ट्रेन क्रमांक 11411 ही 16 ऑगस्टपासून परळीहून 07.25 वाजता सुटेल आणि 17.55 वाजता मिरजला पोहोचेल. तर परळीहून मिरजगाडी घाटनांदूर, पानगाव , जानवळ , वडवळ नागनाथ,   कारेपूर,  लातूर रोड, लातूर, ढोकी येडशी, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, धालगाव मार्गे मिरजला जाईल. दरम्यान, वडवळ नागनाथ, जानवल, कारेपूर, पानगाव आणि घाटनांदूर  स्टेशनवर गाडी थांबेल. या ट्रेनमध्ये 10 जनरल डबे असतील.

Web Title: Finally, Parali-Miraj railway will run again; Inconvenience of devotees and passengers will be avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.