अखेर जि.प.कडून जलयुक्तची कामे

By Admin | Published: February 18, 2016 11:30 PM2016-02-18T23:30:42+5:302016-02-18T23:43:44+5:30

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेच्या ४.५७ कोटी रुपयांच्या कामांना जलव्यवस्थापन समितीत मान्यता देण्यात आली आहे.

Finally, water works by zip | अखेर जि.प.कडून जलयुक्तची कामे

अखेर जि.प.कडून जलयुक्तची कामे

googlenewsNext

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेच्या ४.५७ कोटी रुपयांच्या कामांना जलव्यवस्थापन समितीत मान्यता देण्यात आली आहे. आता ही कामे प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहेत.
जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, सभापती अशोक हरण, सिंधुताई कऱ्हाळे, सहेल्याबाई भोकरे, शोभाताई झुंझुर्डे, अतिरिक्त मुकाअ ए. एम. देशमुख आदींची उपस्थिती होती. हिंगोली जिल्हा परिषदेने गतवर्षी जलयुक्त शिवाय योजनेत कामे केली नव्हती. त्यावरून बरीच ओरड झाली होती. यंदा मात्र या योजनेतील कामांसाठी जवळपास साडेचार कोटींची अंदाजपत्रके या विभागाने तयार केली. त्याला जलव्यवस्थापन समितीत गुरुवारी मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेत येणाऱ्या गावांत ३.१९ कोटी रुपयांच्या ३१ सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना मान्यता देण्यात आली. त्यात हिंगोली तालुक्यातील देऊळगावला-३, राहोली-२, सावा-१, गोर्लेगाव-१, माळेगाव-३, हातमाली-२, चिखली-१, शिवनी-२, वारंगा-१, चिंचोर्डी-१, रामवाडी-२, चुंचा-१, सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा-२, सिंदगी खांबा-१, देवूळगाव जहागीर-१, माहेरखेडा-१, वसमत तालुक्यातील कुडाळा-२, हट्टा-१, थोरावा-२, सुरेगाव-१, केळी-१ अशी गावनिहाय कामांची संख्या आहे.
नाला खोलीकरणाचीही ७९.३९ लाखांची ४१ कामे घेण्यात येणार आहेत. यात सेनगाव तालुक्यातील कवठा-३, सुलदली-१, बटवाडी-२, हत्त्ता-१, जयपूर-१, साखरा-१, वरूड चक्रपान-३, कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी-१, रामवाडी-१, रजपूतवाडी-१, बेलथर-१, निमटोक-१, वारंगा-१, औंढा तालुक्यातील उखळी-१, पाझरतांडा-१, बेरुळा-१, कुंडल पिंपरी-१, केळी-१, दुधाळा-१, वसमत तालुक्यातील कळंबा-१, वाघी-१, सिरली-३, कोठारी-१, खापडखेडा-१, हट्टा-१, हिंगोली तालुक्यातील सावा-१, वडद-१, राहोली-१, वरूड गवळी-१, सावरखेडा-१, डिग्रस कऱ्हाळे-२, पेडगाव-१ अशी गावनिहाय कामांची संख्या आहे. तर तलाव/ बंधाऱ्यांची नवी अथवा दुरुस्तीची ५८ लाखांची ६ कामे यात आहेत.
कळमनुरी तालुक्यात येहळेगाव, पोत्रा, माळहिवरा, ब्राह्मणवाडा, पांगरा शिंदे, वरूड चक्रपान या गावांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीत दोन सिमेंट नाला बांधाच्या कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. एक काम ऐनवेळी बदलण्यात आले. तर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट टाकण्यास १ लाखाऐवजी १.८0 लाख देण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य उद्धवराव गायकवाड, द्वारकादास सारडा यांचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Finally, water works by zip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.