अखेर जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:59 PM2019-05-17T21:59:35+5:302019-05-17T21:59:46+5:30

ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर शुक्रवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.

Finally, the work of repairing the water works started | अखेर जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

अखेर जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

googlenewsNext

वाळूज महानगर: लोकमतने वडगावच्या मुख्य जलवाहिनीला पंढरपुरातील महावीर चौकात गळती सुरु असल्याने टंचाईच्या काळात पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त प्रकाशित करुन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागी झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर शुक्रवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.


वडगाव कोल्हाटी गावाला अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे टँकरवर अवलंबून असलेल्या वडगावचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायतीने बजाज गेटजवळील एमआयडीसी जलकुंभापासून पंढरपूर, बजाजनगर मार्गे वडगाव जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकली आहे.

जवळपास दीड कोटी रुपये खर्च करुन टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनी पंढरपुरातील महावीर चौकात रस्ता रुंदीकरणाचे खोदकाम करताना फुटली. या घटनेला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. या ठिकाणी गळती सुरु असल्याने दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. याविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करुन ही बाबा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामपंचायतीने तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेवून शुक्रवारी दुपारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

Web Title: Finally, the work of repairing the water works started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.