फुलंब्री तालुक्यात पोखरा योजनेतून चार हजार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:03 AM2021-05-27T04:03:57+5:302021-05-27T04:03:57+5:30
फुलंब्री : तालुक्यात २५ गावांत राबविल्या जाणाऱ्या पोखरा योजनेत शेतकऱ्याच्या खात्यावर १९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आले. ही ...
फुलंब्री : तालुक्यात २५ गावांत राबविल्या जाणाऱ्या पोखरा योजनेत शेतकऱ्याच्या खात्यावर १९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आले. ही योजना यशस्वी होत असून, यातून ४ हजार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजना सुरू केली. ही योजना आता शेतकऱ्यांच्या शेतीला बळकटी व आर्थिक बळ देणारी व त्यांना सक्षम करणारी म्हणून समोर येत आहे. ज्या ज्या गावात ही योजना राबविली जात आहे, तेथील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल झालेला दिसून येत आहे.
--
फुलंब्री तालुक्यातील २५ गावांचा पोखरा योजनेत समवेश करण्यात आला. यातील चार हजार शेतकऱ्यांनी विविध योजनांचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. विविध योजनांतून गेल्या तीन वर्षांत आतापर्यंत १९ कोटी रुपयांचे अनुदान मिळालेले आहे.
-
पोखरा योजनेत याचा आहे समावेश
बांधावर वृक्षलागवड, कुक्कुटपालन, सामूहिक शेततळी, वैयक्तिक शेततळी, ठिबक सिंचन, शेततळ अस्तरीकरण, मत्स्यपालन, फळबाग लागवड, पॉलीहाउस, पवार विडर, रेशीम उद्योग, शेड-नेट हाउस, शेळीपालन, तुषार सिंचन, ट्रॅक्टर, मोटारपंप, अशा एकूण २२ प्रकारची कामे कृषी विभागाच्या वतीने या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
-
कोट
पोखरा कृषी संजीवनी योजनेत मी शेडनेट व शेततळे घेतले. यातून सिमला मिरची, काकडीचे उत्पन्न काढले. त्यामुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात वाढ झालेली आहे.
-सोमीनाथ धोंडकर, शेतकरी, लिहा जहांगीर
-
कोट
तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने पोखरा योजना राबविली जात आहे. यात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांमधून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झालेली आहे. विशेष बाब म्हणजे नगदी पैसा त्यांच्या हाती आला आहे.
-काकासाहेब इंगळे, तालुका कृषी अधिकारी
फोटो :
कृषी विभागाच्या वतीने पोखरा योजनेत वाहेगाव येथे दिलेले शेततळे.
260521\img-20210525-wa0110_1.jpg
कृषी विभागाच्या वतीने पोखरा योजनेत वाहेगाव येथे दिलेले शेततळे .