स्वागताला प्लास्टीक कव्हरमध्ये पुष्पगुच्छ आणल्याने दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:30 AM2020-01-11T03:30:38+5:302020-01-11T03:30:47+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्लास्टीक कव्हरमध्ये पुष्पगुच्छ आणणाऱ्यांना महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दंड ठोठावला.

Fine welcoming wreath in a plastic cover is fine | स्वागताला प्लास्टीक कव्हरमध्ये पुष्पगुच्छ आणल्याने दंड

स्वागताला प्लास्टीक कव्हरमध्ये पुष्पगुच्छ आणल्याने दंड

googlenewsNext

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्लास्टीक कव्हरमध्ये पुष्पगुच्छ आणणाऱ्यांना महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दंड ठोठावला. जालना, लातूर येथील दोन जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडही वसूल करण्यात आला.
जालन्याचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव व लातूरचे तालुकाप्रमुख रमेश पाटील यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची पावती देऊन दंड वसूल केला. आयुक्तांच्या या कारवाईनंतर अनेक राजकीय मंडळींनी पुष्पगुच्छांना असलेले प्लास्टिक काढून टाकले. काही जण पुष्पगुच्छासह भुर्र झाले. आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी प्लास्टिकमध्ये पुष्पगुच्छ आणणाºया अधिकाºयाला पाच हजार रुपये दंड केला होता. त्यानंतर भाजप नगरसेविकेने पेन भेट देताना प्लास्टिक कव्हर वापरले म्हणून ५०० रुपयांचा दंड लावला होता.

Web Title: Fine welcoming wreath in a plastic cover is fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.