अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:35 PM2019-03-18T22:35:41+5:302019-03-18T22:35:53+5:30
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात वडगाव कोल्हाटी परिसरात अनाधिकृत बांधकाम व रेखाकंन प्रकरणी तिघांविरुध्द सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाळूज महानगर : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात वडगाव कोल्हाटी परिसरात अनाधिकृत बांधकाम व रेखाकंन प्रकरणी तिघांविरुध्द सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सिडको प्रशासनाच्यावतीने अनधिकृत रेखाकंन व बांधकाम करणाऱ्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहेत. आतापर्यंत सिडकोने वाळूजमहानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी, शेखापुर, वाळूज आदी गावातील विकासकाविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तीन महिन्यांपूर्वी सिडकोच्या अधिकाऱ्यांचे पथक अनधिकृत बांधकामाच्या पाहणीााठी गेले होते.
यात वडगाव कोल्हाटी परिसरात संतोष रामदास चंदन, परमेश्वर सुर्यभान नाझरकर, दत्ता शंकर डोंगरे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यामुळे सिडको प्रशासनाकडून संबधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. नागरिकांची फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.