नंदीग्राम एक्स्प्रेसच्या अतिरिक्त इंजिनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:05 PM2019-10-03T23:05:56+5:302019-10-03T23:08:12+5:30
देवळगाव स्थानकाजवळ सायंकाळी 7 वाजताची घटना
औरंगाबाद/पूर्णा : परभणीहून मुंबईकडे जाणा-या नागपूर- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसच्या अतिरिक्त इंजिनला आग लागल्याची घटना देवलगाव रेल्वे स्टेशनजवळ ३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०२) ही रेल्वे दैनंदिन वेळेनुसर परभणीहून मुंबईकडे रवाना झाली. ही गाडी देवलगाव अवचार स्टेशन दरम्यान आली असता या गाडीच्या अतिरिक्त इंजिनच्या खालील बाजूस ट्रेक्शन मोटारला आग लागली असल्याची बाब रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पवार यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचा-यांना माहिती दिली. त्यानंतर इंजिनमध्ये असलेल्या छोट्या अग्नीशमन बंबच्या साह्याने ही आग विझविण्यात आली. आग लागलेले इंजिन पूर्णपणे बंद करुन सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही गाडी दुस-या इंजिनच्या साह्याने पुढे रवाना झाली.
या घटनेमुळे नंदीग्राम एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावली. तसेच या घटनेमुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर मुंबईकडे जाणारे प्रवासी ताटकळले होते. मुंबईला जाण्यास विलंब झाल्याचे अरविंद हटकर यांनी सांगितले.