फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 08:50 AM2024-11-10T08:50:13+5:302024-11-10T08:51:10+5:30

फुलंब्री शहरात दरी फाटा भागात राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान आहे.

Fire at a shop selling plastic materials in Phulambri; Three dead, two seriously injured | फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

फुलंब्री: येथील दरी फाटा येथे असलेल्या प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानात शनिवारी माध्यरात्रीला शॉक सर्किटमुळे आग लागून तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीरपणे जखमी झाले. जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फुलंब्री शहरात दरी फाटा भागात राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाण प्लास्टिक साहित्य भरलेले होते
शनिवारी रात्री एक वाजून 45 मिनिटांनी दुकानातील आतील भागात शॉक सर्किटमुळे आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात धुके व गॅस तयार झाला. आग लागल्याची माहिती दुकान मालक व शेजारी असलेल्या दुकान मालकांना समजली असता ते दुकान उघडण्यास धावले. 

दुकानाचे शटर उघडताच आतमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे तीन लोक वेगाने बाहेर फेकले गेले, यात ते लोखंडी पार्टवर आदळले तसेच आगीत होरपळले. यात नितीन रमेश नागरे (वय 25), गजानन वाघ (वय 30), राजू सलीम पटेल (वय 25) या तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व फुलंब्री येथील रहिवाशी होते.तर घटनेत शाहरुख सलीम पटेल व अजय सुभाष नागरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोघे होमगार्ड
घटनेतील मयत गजानन वाघ व जखमी शाहरुख पटेल हे दोघे चांगले मित्र होते. ते होमगार्डमध्ये आहेत. शाहरुख पटेल याचा मयत भाऊ राजू पटेल याचे दुकान असल्याने हे आग विझविण्या करीता घटनास्थळी गेले होते.फुलंब्री पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Fire at a shop selling plastic materials in Phulambri; Three dead, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.