शहरात एटीएमला आग; मोठी हानी टळली
By Admin | Published: February 4, 2017 12:47 AM2017-02-04T00:47:33+5:302017-02-04T00:50:56+5:30
जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील एका एटीएमच्या खोलीला अचानक आग लागली.
जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील एका एटीएमच्या खोलीला अचानक आग लागली. वेळीच ही आग विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शिवाजीपुतळा परिसरात पोस्ट आॅफिस रोडवर एसबीआय बॅकेच्या इमारतीतच बँकेचे एटीएम आहे. याठिकाणी एटीएम आणि सिडीएम मशीन आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एटीएम मशीनच्या खोलीत शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. एटीएमवर पैसे काढण्यासाठी आलेल्या एका ग्राहकास हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ अग्निशमक दलास माहिती दिली. त्यावरून अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवली.
या आगीत सीसीटीव्ही मॉनिटर, बॅटरी, संगणक, दोन एसी मशीन, फर्निचर आदी साहित्य जळून नुकसान झाले. तसेच सीडीएम व एटीएम मशीनचा काही भागाला आगीच्या झळया लागल्याने या मशीनचेही वरवर नुकसान झाले. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)