अग्निशमन विभाग रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:18 AM2017-12-31T00:18:41+5:302017-12-31T00:18:46+5:30

शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत एका हॉटेलला आग लागल्याने तब्बल १४ जणांना मृत्यू झाला. या घटनेने राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, मोठ्या शहरांमध्ये मॉल, चित्रपटगृह, हॉटेल, मोठ्या इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी कारभार आलबेल असल्याचे चित्र समोर आले.

 Fire Department Ram Bharos | अग्निशमन विभाग रामभरोसे

अग्निशमन विभाग रामभरोसे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत एका हॉटेलला आग लागल्याने तब्बल १४ जणांना मृत्यू झाला. या घटनेने राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, मोठ्या शहरांमध्ये मॉल, चित्रपटगृह, हॉटेल, मोठ्या इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी कारभार आलबेल असल्याचे चित्र समोर आले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने सर्वत्र तपासणीचे आदेश दिले.
शहरात १६ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या शेकडो इमारती मागील काही वर्षांमध्ये तयार झाल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा आवश्यक आहे. दरवर्षी अग्निशमन यंत्रणेची तपासणी करून नाहरकत प्रमाणपत्र मनपाकडून घेणे आवश्यक आहे. दवाखाने, मॉल, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. शहरातील ९० टक्के इमारतींमध्ये ही यंत्रणाच नाही. महापालिकेनेही कधी या इमारतींचे आॅडिट केलेले नाही. मुंबईच्या लोअर परळ भागातील हॉटेलला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही घटना घडल्याने पुन्हा एकदा अग्निशमन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
घोडेले यांनी शहराचा आढावा घेतला असता धक्कादायक चित्र समोर आले. महापालिकेकडे ९० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त आहेत. त्यातील अवघ्या आठ ते दहा इमारतींनाच एनओसी देण्यात आली आहे. उर्वरित इमारतधारकांनी अग्निशमन यंत्रणेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज तसेच पडून आहेत. मनपाच्या अग्निशमन यंत्रणेकडे आग लागलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे आणि पाणी मारणे एवढे एकमेव काम सुरू आहे. अग्निशमन विभागाला याशिवायही अनेक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात, याचा विसर पडला आहे.
तपासणीचे आदेश
च्शहरातील सर्व मोठ्या हॉटेल, इमारती, मॉल आदी ठिकाणी युद्धपातळीवर तपासणी करण्यात यावी, असे आदेश महापौर घोडेले यांनी दिले. शनिवारी सायंकाळपासूनच अग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे व त्यांच्या कर्मचाºयांनी तपासणीला सुरुवात केली. सोमवारपर्यंत सर्व तपासणी करून अहवाल देण्याचे आश्वासनही सुरेयांनी दिले.

Web Title:  Fire Department Ram Bharos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.