जिनिंग प्रेसिंगच्या गोदामाला आग
By Admin | Published: March 13, 2016 02:46 PM2016-03-13T14:46:49+5:302016-03-13T14:50:58+5:30
सोनपेठ: गंगाखेड रस्त्यावर असलेल्या एका जिनिंग प्रेसिंगच्या गोदामाला १२ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजता आग लागली़
सोनपेठ: गंगाखेड रस्त्यावर असलेल्या एका जिनिंग प्रेसिंगच्या गोदामाला १२ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजता आग लागली़ या आगीत सुमारे ३ हजार ५०० कापसाच्या रुईच्या गाठी जळाल्या़ या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली.
सोनपेठ- गंगाखेड राज्य रस्त्यावर राजेश्वरी जिनिंग अँड प्रेसिंग या जिनिंगचे गोदाम आहे़ या गोदामामध्ये कापसाच्या गाठी जमा करून ठेवण्यात आल्या होत्या़
शनिवारी पहाटे ४़३० च्या सुमारास गोदामाला आग लागल्याचे लक्षात आले़ या आगीने रौद्ररुप धारण केले़ ही आग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने सुरुवातीला सोनपेठ व परळी येथील अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले़ यानंतरही आग विझत नसल्याने पाथरी, मानवत येथूनही बंब मागविण्यात आले़ सकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते़ या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, हे मात्र समजू शकले नाही़ या प्रकरणी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोनपेठ पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती़ (वार्ताहर)