मजुराच्या घराला आग; संसारोपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:04 AM2021-04-19T04:04:26+5:302021-04-19T04:04:26+5:30

चिकलठाण येथील रामदास खंडू माळी हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. रविवारी दुपारी त्यांच्या घराला अचानक आग लागली. आजूबाजूच्या ...

Fire at laborer's house; Dust the worldly literature | मजुराच्या घराला आग; संसारोपयोगी साहित्य खाक

मजुराच्या घराला आग; संसारोपयोगी साहित्य खाक

googlenewsNext

चिकलठाण येथील रामदास खंडू माळी हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. रविवारी दुपारी त्यांच्या घराला अचानक आग लागली. आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळताच त्यांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, आग मोठी असल्याने घरातील टीव्ही, मिक्सर, पलंग, धान्य, पत्रे, कपडे, घरातील रोख रक्कम सर्व जळून खाक झाले. यात माळी यांचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. प्रकाश गोपाळ, महादू गोपाळ, संदीप परसे, अनिकेत चव्हाण यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी सरपंच शिवाजी धनेधर, अरविंद धनेधर, प्रताप चव्हाण, राजेंद्र परसे, सलीम सय्यद, फिरोज शहा, नानासाहेब चव्हाण, दत्तू जाधव आदींनी भेट दिली. घरातील स्वयंपाकाच्या गॅसची टाकी ताबडतोब बाहेर काढण्यात आली, नसता मोठा अनर्थ घडला असता. रामदास माळी यांची परिस्थिती गरिबीची असल्याने शासनाने त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

फोटो : चिकलठाण येथे आग लागून रामदास माळी यांच्या घराचे झालेले नुकसान.

180421\20210418_124530_1.jpg

चिकलठाण येथे आग लागून रामदास माळी यांच्या घराचे झालेले नुकसान.

Web Title: Fire at laborer's house; Dust the worldly literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.