डाळिंबाच्या बागेला आग; दहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:04 AM2021-04-02T04:04:16+5:302021-04-02T04:04:16+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील लिंबगाव शिवारात शॉर्टसर्किट झाल्याने डाळिंबाच्या बागेला आग लागली. या आगीत डाळिंबाचे सुमारे एक हजार झाडे ...
पाचोड : पैठण तालुक्यातील लिंबगाव शिवारात शॉर्टसर्किट झाल्याने डाळिंबाच्या बागेला आग लागली. या आगीत डाळिंबाचे सुमारे एक हजार झाडे जळून खाक झाली आहेत. यात शेतकरी अतुल वाव्हळ यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाचोड ते पैठण रस्त्यावरील लिंबगाव शिवारात अतुल बाबूराव वाव्हळ यांची शेती आहे. त्यांनी डाळिंबाची बाग व कपाशी लावलेली आहे. गुरुवारी दुपारी अचानक शॉटसर्किट झाल्याने डाळिंबाची झाडे पेटली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बागेला आग लागली. यासंदर्भात नागरिकांनी अतुल वाव्हळ यांनी माहिती दिली. शेजारील शेतकरी बबन घायाळ यांनी ही माहिती दिली. अतुल वाव्हळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शेजारी मित्रांनी मिळून आग आटोक्यात आणली गेली. या आगीत एक हजार डाळिंबाचे झाडे जळून खाक झाले आहेत. ठिबक सिंचनच्या नळ्या, पाइपलाइन जळून खाक झाली. सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी वाव्हळ यांनी केला आहे, तर महावितरण व कृषी विभागाला माहिती देण्यात आली.