कचऱ्यात ‘अग्नि’परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:58 PM2018-06-02T23:58:43+5:302018-06-02T23:59:50+5:30
कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती. शहरात कचराच दिसू नये म्हणून ही नामी शक्कल लढविण्यात आली होती. मागील एक महिन्यापासून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. शनिवारी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. आता महापालिकेला कचरा प्रश्नात ‘अग्नि’परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
१६ फेबु्रवारी ते आजपर्यंत उन्हाळा होता. महापालिकेने किमान ८० टक्के कचºयाला आग लावण्याचे काम केले. सकाळी आणि रात्री मनपाचे कर्मचारीच कचºयाला आग लावत होते. जुना मोंढा येथे तर कचºयामुळे एक दुकानही जळून खाक झाले होते.
सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्यांवरून मनपाची चोरी चव्हाट्यावर आली. या घटनेतूनही महापालिकेने बोध घेतला नाही. उलट महापालिकेच्या विविध इमारती, चौकाचौकांतील कचºयाच्या ढिगाºयांना आग लावण्याचे काम सुरूच होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. औरंगपुरा, जुनाबाजार, सिटीचौक, मसाप, पैठणगेट, क्रांतीचौक, रोशनगेट आदी अनेक वसाहतींमध्ये कचºयाचे डोंगर साचले आहेत. पावसामुळे कचरा पूर्णपणे ओला झाला आहे. महापालिकेला आता कचºयाला अजिबात आग लावता येणार नाही. आग लावली तरी कचरा अजिबात जळणार नाही, निव्वळ धूर होईल. घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार कचरा जाळता येत नाही. याच नियमांचे उल्लंघन मागील तीन महिन्यांपासून मनपाकडून करण्यात येत होते.
प्रक्रिया करणेही अशक्यप्राय
सिडको-हडकोसह शहरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे. आता पावसाळ्यात ही प्रक्रिया करणेही अवघड आहे.
मनपाने ५ कोटी रुपये खर्च करून ठिकठिकाणी कंपोस्ट पीट तयार केले आहेत. या पीटचा वापर पावसाळ्यात अजिबात होणार नाही. एका पीटमध्ये २१ दिवस ओला कचरा साठवून त्यावर प्रक्रिया करावी लागते.
अनेक आजार पसरणार
ज्याठिकाणी कचरा साचला आहे, तेथे पावसामुळे अनेक जीवजंतू जन्माला येतील. यातून साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. कचºयात मेलेले उंदीर असल्यास त्याच्या पिसवांपासून सुरत शहरात यापूर्वी प्लेग पसरला होता. कचरा साठवून ठेवणे एवढे सोपे नाही, हे मनपाला माहीत असूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.