कोविड सेंटरलगत विद्युत रोहित्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:06 AM2021-04-30T04:06:17+5:302021-04-30T04:06:17+5:30
अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयालगत व कोविड केअर सेंटरपासून काही अंतरावर गुरुवारी रात्री आग भडकली. याठिकाणी रोहित्र असून, रोहित्रातून ठिणगी ...
अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयालगत व कोविड केअर सेंटरपासून काही अंतरावर गुरुवारी रात्री आग भडकली. याठिकाणी रोहित्र असून, रोहित्रातून ठिणगी पडून गवताने पेट घेतला व काही क्षणात आगीचा भडका उडाला. त्यानंतर वीज गेली. सर्वत्र धूर झाल्याने कोविड सेंटरमधील रुग्णांची धावपळ सुरू झाली. काही जण बेड सोडून बाहेर आले. स्प्रेचा वापर करून आग आटोक्यात आणल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले. कोविड केअर सेंटरच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला भांबरे यांनी सांगितले, केंद्रात ७० रुग्ण असून आगीच्या घटनेबाबत काही माहिती नव्हते. विरार येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांपासून रुग्णालयांची तपासणी केली जात आहे.