तीन ठिकाणी हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:31 AM2018-01-03T00:31:55+5:302018-01-03T00:32:49+5:30

भीमा-कोरेगा येथील हल्ल्याच्या घटनेचे औरंगाबादेत मंगळवारी दुसºया दिवशीही पडसाद उमटून ठिकठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना टीव्ही सेंटर परिसरातील सिद्धार्थनगर, रमानगर आणि वाळूज भागातील रांजणगाव शेणपुंजी येथे बंदुकीतून हवेत गोळीबार करावा लागला.

 Firing in the air at three places | तीन ठिकाणी हवेत गोळीबार

तीन ठिकाणी हवेत गोळीबार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भीमा-कोरेगा येथील हल्ल्याच्या घटनेचे औरंगाबादेत मंगळवारी दुसºया दिवशीही पडसाद उमटून ठिकठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना टीव्ही सेंटर परिसरातील सिद्धार्थनगर, रमानगर आणि वाळूज भागातील रांजणगाव शेणपुंजी येथे बंदुकीतून हवेत गोळीबार करावा लागला.
टी.व्ही. सेंटर परिसरातील सिद्धार्थनगर येथे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जमाव रस्त्यावर आला. यावेळी तेथे पोलीस पोहोचताच जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अन्य अधिकारी, कर्मचाºयांसह तेथे धाव घेतली. यावेळी त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन करीत असताना जमावाने त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यातील एक दगड त्यांच्या वाहनाच्या खिडकीला लागला, तर यावेळी पोलिसांनी त्यांच्या दिशेने अश्रुधुराचे नळकांडे फोडले. मात्र, त्याचा कोणताही परिणाम जमावावर झाला नाही. शेवटी लाठीचार्ज करून जमावाला पांगविण्यात आले. यावेळी दगडफेक करणाºया काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे जमाव आणखी चिडला आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. तेव्हा शेवटी पोलिसांनी बंदुकीतून हवेत तीन फै री झाडल्या. रमानगरमधून (पान २ वर)
संचारबंदी नव्हे; जमावबंदीचे आदेश लागू
जिल्ह्यात संचारबंदी नसून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह जिल्ह्यात उमटले. शहरातही जमावबंदी लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी आढावा घेतला.
४पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, अफवांमुळे त्रास होतो आहे. जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे संचारबंदीचा मुद्दा येत नाही. ज्यावेळी संचारबंदी लागू करण्याची गरज भासेल, त्यावर त्याचा अंमल केला जाईल. सकाळी ८ वाजेपासून जिल्हाधिकारी तालुका पातळीवरील यंत्रणेशी संपर्कात होते. जिल्हाधिकारी म्हणाले, हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. चुकीच्या अफवा किंवा वृत्त पसरविणाºयांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
कोम्बिंग आॅपरेशन थांबवा
४आंबेडकरवादी सर्वपक्षीय दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे शिष्टमंडळ व बौद्ध भिक्खूंनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन प्रामुख्याने दलित वसाहतींमध्ये सुरू केलेले कोम्बिंग आॅपरेशन तात्काळ थांबवावे व ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांना सोडून देण्याची मागणी केली. पोलीस आयुक्तांनी ही मागणी तात्काळ मान्य करीत शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे दलित नेत्यांना आवाहन केले.
४भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद सोमवारी रात्रीपासूनच औरंगाबादेत उमटले. त्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता ठेवण्यासाठी दलित नेत्यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे सर्व पक्ष-संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. दुपारी १२ वाजता बैठक सुरूहोण्यापूर्वी शहरातील शेकडो तरुण सुभेदारी विश्रामगृह येथे दाखल झाले. दलित नेत्यांनी भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ आपण संयमाने मोर्चा काढू किंवा जेलभरो (पान २ वर)
लाठीमार, दगडफेकीत
२२ जण जखमी
४मंगळवारी दिवसभरात दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या २२ जणांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बहुतेक सर्वांना किरकोळ मार लागल्याने मलमपट्टी करून सोडून देण्यात आले.
४सिद्धार्थनगर, हडको येथे सर्वाधिक धुमश्चक्री झाली. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल श्याम गायकवाड, अर्जुन चव्हाण जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात शालूबाई क ांबळे, सुनीता काकडे, सखूबाई सुरडकर, पूर्णाबाई दाभाडे, सिद्धार्थ बोर्डे आणि रत्नमाला जाधव जखमी झाले. दोन महिला कॉन्स्टेबल यांना उस्मानपुरा येथे एका महिलेने जबर चावा घेतला. उस्मानपुरा येथे नितीन चव्हाण, संदीप घुसळे यांना मार लागला. एमआयडीसी वाळूज परिसरातील ओयासिस चौकात दगडफेकीत सीमा वाघमारे, ज्ञानदेव वाकळे, रूपा नगराळे, प्रवीण उपारे जखमी झाले.
विविध ठिकाणी फिक्स पॉइंट आणि बंदोबस्त वाढविला -मिलिंद भारंबे
४सोमवारनंतर आज मंगळवारी विविध भागांत दगडफेक आणि वाहने जाळण्याच्या आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर काही जण मुद्दामहून अफवा पसरवीत आहेत, यामुळे शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन समाजकंटक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी विविध ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावले असून, पोलिसांच्या मदतीसाठी एसआरपीच्या सात कंपन्या बोलावण्यात आल्याची माहिती शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त तथा विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याविषयी अधिक माहिती देताना प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले की, भीमा-कोरेगाव येथील घटना निंदणीय आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर (पान २ वर)
पुंडलिकनगर येथील रहिवासी सुदर्शन लाळे हे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लक्ष्मण चावडीतील तारभवन रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात पत्नीला प्रसूतीसाठी दाखल करण्यासाठी कारने आले होते. यावेळी रुग्णालयासमोर रस्त्यावर कार उभी करून ते पत्नीला अ‍ॅडमिट करण्यासाठी आत गेले. त्यानंतर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन तरुणांनी प्रथम कारच्या मागील काचेवर दगड मारला आणि नंतर कार पेटवून देऊन तेथून ते पसार झाले. काही मिनिटांत संपूर्ण कारने पेट घेतला. रुग्णालयाबाहेरील लोकांना हा प्रकार दिसताच त्यांनी लाळे यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर शेजारील एका बंगल्यातून पाण्याचा मारा करून त्यांनी आणि अन्य लोकांनी कार विझविली; मात्र तोपर्यंत कारचा केवळ सांगाडा उरला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पो.नि. श्रीपाद परोपकारी, शिवाजी कांबळे, श्रीकांत नवले आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title:  Firing in the air at three places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.