किरकोळ वादातून जीम ट्रेनरवर गावठी कट्ट्यातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:06 PM2019-04-10T13:06:26+5:302019-04-10T13:08:16+5:30
किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण
औरंगाबाद: किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण करण्यासाठी आलेल्या तीनपैकी एका जणाने गावळी पिस्टलमधून गोळी झाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे घडला. सुदैवाने झाडलेली गोळी थेट न जाता वर उडून पडल्याने तरूणाचे प्राण वाचले. याघटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
शेख अलीम शेख नवाब (वय २६, रा.गारखेडा)असे गोळीबारातून वाचलेल्या जीम ट्रेनरचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शेख अलीमचा नातेवाईक अनीस खान (वय २२,रा. देवळाई )हा मंगळवारी रात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजेच्या सुमारास गारखेड्यातून देवळाईकडे मोटारसायकलने जात किरकोळ वादातून जीम ट्रेनरवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.
शिवाजीनगर येथील एका वाईन शॉपजवळ त्याला त्याचा ओळखीचा तरूण उभा दिसला. यामुळे अनिस त्याच्याजवळ थांबला आणि तू एवढ्या रात्री येथे काय करतो, असे म्हणाला. यावेळी तेथे असलेल्या अन्य तीन तरूणांनी अचानक अनीसला शिवीगाळ करून भांडण करण्या सुरवात केली. ही बाब अनिसने अलीमला फोन करून कळविली. यामुळे अलीम हा अन्य दोन साथीदारांना घेऊन शिवाजीनगर येथे गेला आणि त्यांनी मारहाण करणाऱ्यांना भांडण सोडविले.
दरम्यान, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अलीम हा शिवाजीनगर येथील त्याच्या नयन फिटनेस सेंटर या व्यायामशाळेत गेला होता. सव्वासात वाजेच्या सुमारास रात्री मारहाण करणारे अचानक जीममध्ये आले आणि त्यांनी अलीला जीमबाहेर बोलावले. तेथे त्यांच्यापैकी एकाने कमरेचा गावठी पिस्टल काढून अलीमच्या पोटाला लावले. तुला खतम करतो, असे म्हणून पिस्टलमधून गोळी झाडली, मात्र पिस्टल लॉक झाल्याने गोळी थेट अलीमवर न जाता ती पिस्टलमधून वर उडून खाली पडल्याने तो बांलबाल बचावला. या घटनेची माहिती अलीमने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविली.