परळी शहरामध्ये गोळीबार

By Admin | Published: July 16, 2016 12:52 AM2016-07-16T00:52:16+5:302016-07-16T01:15:40+5:30

परळी : शहरातील बसस्थानकासमोर गुरुवारी सायंकाळी सात वाजता युवकांच्या दोन गटांत वादावादी झाली. त्यानंतर गोळीबारही झाला. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दिली.

Firing in Parli city | परळी शहरामध्ये गोळीबार

परळी शहरामध्ये गोळीबार

googlenewsNext


परळी : शहरातील बसस्थानकासमोर गुरुवारी सायंकाळी सात वाजता युवकांच्या दोन गटांत वादावादी झाली. त्यानंतर गोळीबारही झाला. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यावरुन ३२ जणांविरुद्ध खुनी हल्ला केल्याचा गुन्हा नोंद झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, बसस्थानकासमोरील एका खासगी दवाखान्याजवळ बाबासाहेब वैजनाथ फड (रा. कन्हेरवाडी ता. परळी) हे उभे होते. यावेळी राजेश बंडू फड (रा. कन्हेरवाडी ता. परळी) याने त्यांच्या दिशेने गोळीबार केला; परंतु त्यांनी गोळी चुकविली. त्याच्यासोबत १५ ते २० सहकारीही तेथे होते. यावेळी त्याने कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे यांच्या घराच्या दिशेनेही एक गोळी झाडली, अशी फिर्याद बाबासाहेब फड यांनी दिली. त्यावरुन शहर ठाण्यात राजेश फडसह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर प्रा. टी.पी. मुंडे हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शहर ठाण्यात पोहोचले. त्यांनी आरोपींवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी लावून धरली. रात्री उशिरापर्यंत ते ठाण्यात बसून होते.
विशाल वालचंद उदगीरकर (रा. परळी) यांनी बबलू मुंडे, प्रा. विजय मुंंडे यांच्यासह बारा जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, बसस्थानकासमोर ते उभे होते. यावेळी या सर्वांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. त्यांनी हल्ला चुकविल्याने बोटाला जखम झाली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद आहे.
पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार नोंदवून घेतली. घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट नाही. शुक्रवारी दिवसभर या घटनेचीच शहर व परिसरात चर्चा होती. (वार्ताहर)

Web Title: Firing in Parli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.