अभिमानास्पद ! औरंगाबादची फर्म हाताळणार दिल्ली मेट्रोचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 05:54 PM2021-03-16T17:54:39+5:302021-03-16T17:56:56+5:30

The firm in Aurangabad will handle the Delhi Metro Project एक्सलाइज ही बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट फर्म असून, त्याचे संस्थापक प्रताप धोपटे आणि सहसंस्थापिका सोनाली धोपटे यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे.

The firm in Aurangabad will handle the Delhi Metro Project | अभिमानास्पद ! औरंगाबादची फर्म हाताळणार दिल्ली मेट्रोचा कारभार

अभिमानास्पद ! औरंगाबादची फर्म हाताळणार दिल्ली मेट्रोचा कारभार

googlenewsNext
ठळक मुद्देएक्सलाइज इंजिनीअरिंग सर्व्हिसेसचे डौलदार यशतीन कंपन्यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर सेटअप तयार करण्यात येत आहे

औरंगाबाद : डीएमआरसी म्हणजेच, दिल्लीमेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रकल्पाच्या सॉफ्टवेअर संबंधित कामकाजासाठी इंटिग्रेटेड प्रोजेक्ट मॉनिटरिंग सॉफ्टवेअर तयार झाले असून, या सॉफ्टवेअरचे काम ज्या तीन कंपन्यांना देण्यात आले आहे, त्यापैकी एक्सलाइज इंजिनीअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी औरंगाबादची असून, थेट दिल्लीमेट्रोचे काम हाताळणार आहे.

एक्सलाइज ही बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट फर्म असून, त्याचे संस्थापक प्रताप धोपटे आणि सहसंस्थापिका सोनाली धोपटे यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे. दिल्ली मेट्रो प्रकल्पाचे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मॉनिटरिंग करण्याचे काम एक्सलाइजसह मैनसाईकॉम आणि नादी या दोन फर्मच्या माध्यमातून होत आहे. ऑक्टोबरपासून मूळ कामाला सुरुवात झाली असून, कामाचा पहिला टप्पा मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. संपूर्ण काम होण्यास अजून ५ ते ७ वर्षांचा कालावधी लागणार असून, या कामासाठी आलेला आणि भविष्यात येणारा खर्च, वेळ, कामास होणारा उशीर, मटेरिअल या सर्व तपशिलासाठी या तीन कंपन्यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर सेटअप तयार करण्यात येत आहे, जेणेकरून हा प्रोजेक्ट कधीही तपासून पाहणे शक्य होणार आहे. एक्सलाइजने यापूर्वी नागपूर मेट्रोसाठीही काम केले आहे.

वेगळी वाट निवडली
आमच्या माध्यमातून औरंगाबादच्या एका कंपनीला दिल्ली मेट्रोचा प्रोजेक्ट सांभाळायला मिळाला, याचा आनंद वाटतो. आपल्याकडे कोणी या दिशेने प्रयत्न करताना दिसत नाही. काहीतरी वेगळे करायचे, म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आणि आम्हाला यश मिळाले. या वेगळ्या वाटा इतरांनीही निवडल्या, तर निश्चितच त्यांनाही मोठ्या संधी मिळतील.
- सोनाली धोपटे, सहसंस्थापक, एक्सलाइज इंजिनीअरिंग सर्व्हिसेस

Web Title: The firm in Aurangabad will handle the Delhi Metro Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.