पहिल्याच प्रयत्नात सुनीलने यूपीएससीत मिळविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:05 AM2021-04-19T04:05:06+5:302021-04-19T04:05:06+5:30

सुनील निकम याचे वैजापूर येथील सेंट मोनिका इंग्लिश स्कूल मध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर औरंगाबादेतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुढील ...

In the first attempt, Sunil got success from UPS | पहिल्याच प्रयत्नात सुनीलने यूपीएससीत मिळविले यश

पहिल्याच प्रयत्नात सुनीलने यूपीएससीत मिळविले यश

googlenewsNext

सुनील निकम याचे वैजापूर येथील सेंट मोनिका इंग्लिश स्कूल मध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर औरंगाबादेतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. तर मुंबईत बी.टेक. पदवी संपादन केली. रेल्वे विभागातही त्याची निवड झाली होती. सध्या सरकारच्या नॅशनल थर्मल पॉवर को-ऑपरेशन कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. वैजापुरातील ॲड. आर. डी. थोट यांचा तो नातू आहे. अवघ्या बावीसाव्या वर्षी सुनील याने यूपीएससीची परीक्षेत यश संपादन केले. त्याचे मित्र परिवारांकडून कौतुक केले जात आहे.

-----

नोकरी सांभाळीत मिळविले यश

नॅशनल थर्मल पॉवर कंपनीत नोकरी करीत असताना देखील सुनील याने मोठ्या जिद्दीने परिक्षेची तयारी केली. २० जानेवारी २०२० रोजी पुर्व परिक्षा झाली. यात यश उत्तीर्ण झाल्यानंतर १८ ऑक्टोंबर रोजी मुख्य परिक्षा दिली. त्यातही यश मिळाल्यानंतर २४ मार्च २०२१ रोजी मुलाखत झाली. या परिक्षेचा निकाल नुकताच १० एप्रिल रोजी जाहीर झाला. कमी वयात मोठे यश संपादन केल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर सुनील याने आदर्श उभा केला आहे.

फोटो :

180421\20210418_182442_1.jpg

पहिल्याच प्रयत्नात सुनीलने युपीएससीत मिळविले यश

Web Title: In the first attempt, Sunil got success from UPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.