आरटीई प्रवेश नोंदणीच्या पहिल्या दिवशीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:12+5:302021-03-04T04:07:12+5:30
पालकांसमोर अडचणींचा डोंगर औरंगाबाद : आरटीई प्रवेशाची २०२१ - २२ साठीची बुधवारपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात ६०३ ...
पालकांसमोर अडचणींचा डोंगर
औरंगाबाद : आरटीई प्रवेशाची २०२१ - २२ साठीची बुधवारपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात ६०३ शाळांतील ३६२५ जागांसाठी सुरू असलेल्या या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीलाच पालकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशी दुपारी ४ वाजल्यानंतर सुरू झालेल्या संकेतस्थळावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत २९५ जणांनी नोंदणी केली होती.
मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यास प्रवेश देण्यात येतो. २०२१ - २२ करिता अर्ज प्रक्रिया ३ ते २१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज भरताना पालकांनी काळजी घ्यावी. ज्या शाळांमध्ये प्रवेशाची मागणी अर्जामध्ये केली आहे. त्याच जागेवर ती शाळा सुरू असल्याची खात्री पालकांनी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
--
गैरप्रकार थांबवण्याची मागणी
---
नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल करून दोनपेक्षा अधिक शाळांसाठी नोंदणी केली जाते. सीबीएसई शाळेतील प्रवेशासाठी नामांकित शाळेजवळ राहण्याचे पालकांकडून खोटे भाडेकरार सादर होतात. त्याची पोलीस व महसूल विभागामार्फत चौकशी व्हावी. तसेच खोटे कागदपत्र दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीची पुणे आणि कोल्हापूरसारखी यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी आरटीई पालक संघाकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे प्रशांत साठे यांनी केली आहे.