छोटे नवाबची पहिली झलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:02 AM2021-03-09T04:02:01+5:302021-03-09T04:02:01+5:30
करिना कपूर खान सध्या छोटे नवाबसह क्वॉलिटी टाइम एन्जॉय करत आहे. दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यापासून चाहत्यांनाही छोटे नवाबला पाहण्याची ...
करिना कपूर खान सध्या छोटे नवाबसह क्वॉलिटी टाइम एन्जॉय करत आहे. दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यापासून चाहत्यांनाही छोटे नवाबला पाहण्याची उत्सुकता होती. मात्र, अजूनपर्यंत बाळाची झलक पाहायला मिळाली नव्हती. अखेर महिला दिनाचे औचित्य साधत करिनाने चाहत्यांना छोटे नवाबची झलक दाखवली आहे. बाळाला कुशीत घेत्याचा फोटो तिने शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटो बाळाचा चेहरा दिसत नसला तरी एक झलक पाहायला मिळाल्यामुळे चाहत्यांनीही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
श्रुतीच्या हॉट अदा
अभिनेत्री श्रुती मराठेच्या अभिनयासोबत तिचे सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. श्रुतीने नुकतेच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. फोटोमध्ये ती काळ्यारंगच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोवर तिने, कोणतीच गुप्तता नाही; पण हा तुमचा विषय नाही, असे कॅप्शन दिले आहे. मात्र, यात तिचा एक दंड उघडा दिसत आहे. यामुळे काहीजण तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. लस घ्यायला ड्रेस, लस घेतली का मॅडम, असे प्रश्न कमेंट करून तिला ट्रोल केले जातेय. श्रुतीने यावर अद्याप आपली कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
मिस्टर कपूर तुम्ही तर कमाल केलीत...
सध्या ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी’ चॅलेंजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी हे चॅलेंज पूर्ण करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहेत. आता त्यात मीरा व शाहिदच्या नावाचीही भर पडली आहे. मीराने शाहिदला हे चॅलेंज दिले. नवरोबा हे चॅलेंज पूर्ण करू शकणार नाहीत, असे तिला वाटले होते; पण शाहिदने तिचा हा अंदाज खोटा ठरवला. मग काय, मीरा मिस्टर कपूरवर खूपच खुश झाली. ‘चॅलेंज स्वीकारण्यासाठी कायम सज्ज. मिस्टर कपूर, तुम्हाला हे सहज जमलंय, कमाल आहे...,’ अशा शब्दांत तिने शाहिदचे कौतुक केले आहे. सोबत चॅलेंज पूर्ण करतानाचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे.