पहिल्या पावसानेच अंधार
By Admin | Published: June 5, 2016 11:46 PM2016-06-05T23:46:54+5:302016-06-05T23:56:34+5:30
औरंगाबाद : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक वसाहती तसेच लगतच्या देवळाई, सातारा, छावणी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे हजारो ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागले.
औरंगाबाद : शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणची यंत्रणा पुरती कोलमडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक वसाहती तसेच लगतच्या देवळाई, सातारा, छावणी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे हजारो ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागले.
पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरण कंपनीने शहरात नुकतीच देखभाल, दुरुस्तीची कामे केली होती. मात्र त्यानंतरही रविवारी शहरातील निम्मा भाग अंधारात बुडाला. शहरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जोराच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच वेळात टीव्ही सेंटर, एन-११, काल्डा कॉर्नर, (पान ७ वर)
पावसामुळे नाही तर वाऱ्यामुळे काही भागात वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. कुठे तारेला तार चिकटल्यामुळे तर कुठे झाडाच्या फांद्या तारांवर पडल्यामुळे वीज गेली होती. मात्र, बहुतेक ठिकाणी आम्ही कमीत कमी वेळेत प्रयत्नपूर्वक वीजपुरवठा पूर्ववत केला.
- ए. ए. पठाण, कार्यकारी अभियंता
चेतनानगर, अॅम्बेसीडर, मुकुंदवाडी फिडरवर वीजपुरवठा खंडित झाला होता. पण तो युद्धपातळीवर पूर्ववत करण्यात आला. बऱ्याच वेळा खांबांवरील पीन इन्सुलेटरमध्ये हेअर क्रॅक असतो. त्यात पाणी गेल्यास आवाज होऊन वीजपुरवठा खंडित होतो. पहिल्या एक-दोन पावसातच असे हेअर क्रॅकचे पीन इन्सुलेटर बदलले जातात. नंतर संपूर्ण पावसाळा कितीही मुसळधार पाऊस झाला तरी वीज जात नाही.
- भुजंग खंदारे, कार्यकारी अभियंता