पाच वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीत ४० टक्के जिवंतसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:35 PM2020-07-11T20:35:28+5:302020-07-11T20:36:46+5:30

जलसंपदा : १६ मध्यम प्रकल्पांत २० टक्क्यांपर्यंत, ९३ लघु प्रकल्पांत १३ टक्के पाणी  

For the first time in five years, 40 per cent live stock in Jayakwadi | पाच वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीत ४० टक्के जिवंतसाठा

पाच वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीत ४० टक्के जिवंतसाठा

googlenewsNext

औरंगाबाद : येथील उद्योग, व्यापार आणि सामान्यजणांची जीवनवाहिनी असलेल्या नाथसागरात (जायकवाडी धरण) यंदा मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच जुलैच्या सुरुवातीला ४० टक्के जिवंत जलसाठा आहे. 

गेल्या वर्षी खरीप आणि रबी हंमागाची सात आवर्तने देऊनही धरणात जिवंत साठ्याचे प्रमाण मोठे आहे. ही मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब आहे. जायकवाडी धरणाला बांधून ४४ वर्षांचा काळ लोटला आहे. या काळात सर्वाधिक वेळा दरवाजांचे आॅपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग गेल्यावर्षी विविध वेळा करण्यात आला. 

उन्हाळ्यात खरीप हंगामासाठी ४ आवर्तने (पाणी सोडणे) देण्यात आली. रबी हंगामासाठी ३ आवर्तने देण्यात आली. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यामुळे  पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. परभणी जिल्ह्यातील शाखा कालवा येथून २०८ कि.मी. अंतरावर असून, तिथपर्यंत धरणातून पाणी सोडण्यात आले. कृषीसाठी हे वर्ष ही चांगले ठरण्याची अपेक्षा आहे.

४६ दिवस दरवाजे उघडले 
गेल्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे ४६ दिवस खुले करण्यात आले. धरणाला एकूण २७ दरवाजे असून, १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे उघडलेले नव्हते. १० ते २७ क्रमांकांपर्यंतचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणांच्या ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड पहिल्यांदाच झाला आहे. आजवर 
५ ते १० वेळा ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड आहे. 
१०० अधिक वेळा ‘गेट आॅपरेशन’ मागच्या पावसाळ्यात झाले.

२०१६ मध्ये धरण होते मृतसाठ्यात 

पाच वर्षांतील लघु व मध्यम प्रकल्पांची स्थिती
जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९३ लघु प्रकल्प आहेत.
यामध्ये ३९३ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे.  

मध्यम प्रकल्प मागील पाचपैकी तीन वर्षे २०१५ ते २०१८ पर्यंत मृतसाठ्यात होते. २०१९ साली या प्रकल्पांत ५० टक्क्यांपर्यंत पाणी आले. काही प्रकल्प भरले. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये २० टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पांत २०१५ ते २०१७ शून्य टक्के पाणी होते. २०१७ साली ४ टक्के, तर २०१८ साली ७ टक्के पाणी होते. २०१९ साली दीड टक्का, तर २०२० सालच्या जूनपर्यंत १३ टक्के पाणी लघु प्रकल्पांत आहे. 

Web Title: For the first time in five years, 40 per cent live stock in Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.