जिल्हा परिषदेत ५४ सदस्य करणार पहिल्यांदाच एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 12:50 AM2017-02-26T00:50:22+5:302017-02-26T00:51:00+5:30
लातूर लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत यावेळी नवा इतिहासच घडला़ त्याचबरोबर ५८ पैकी ५४ उमेदवार हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पाऊल ठेवत आहेत़
हरी मोकाशे लातूर
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत यावेळी नवा इतिहासच घडला़ त्याचबरोबर ५८ पैकी ५४ उमेदवार हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पाऊल ठेवत आहेत़ त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे़ आता जिल्हा परिषदेचा कारभार नवख्यांच्या हाती येणार आहे़
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ३५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपाने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे़ भाजपाने ३६ जागा मिळविल्या आहेत़ काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे़ शिवसेना आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे़ सत्ता मिळविणाऱ्या भाजपाने या निवडणुकीत नवी रणनिती आखून नवख्यांना संधी दिली आणि त्याचा अपेक्षित लाभही झाला आहे़ जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते रामचंद्र तिरूके आणि मदनसुरी गटातील भाजपाचे संतोष वाघमारे यांना दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत संधी मिळाली आहे़ त्याच बरोबर काँग्रेसचे उजनी गटातील नारायण लोखंडे आणि राष्ट्रवादीच्या तोगरी गटातील आशा पाटील यांनाही जिल्हा परिषदेची दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे़
भाजपच्या भारतबाई सोळंके, अरूणा बरमदे, संजय दोरवे, धोंडिराम बिरादार, कुसूम हालसे, मिलिंद लातूरे, बजरंग जाधव, गोविंद चिलकुरे, राजीव कांबळे, कल्पना कांबळे, दैवशाला कोलपाक, महेश पाटील, सुरेश लहाने, सुरेंद्र गोडभरले, संगीता घुले, रोहिदास वाघमारे, अरूणा कांबळे, विमल पाटील, सुधाकर श्रृंगारे, धनश्री अर्जुने, प्रिती शिंदे, अरूणा शिंगडे, मनिषा वाघमारे, अशोक केंद्रे, प्रकाश देशमुख, मुद्रिका भिकाणे, मधुबाला कांबळवाड, विजया बिराजदार, ज्योती राठोड, राहूल केंद्रे, उषा रोडगे, बसवराज बिराजदार, प्रशांत पाटील, पृथ्वीराज शिवशिवे हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पाऊल ठेवित आहेत़
काँग्रेसचे धीरज देशमुख, धनंजय देशमुख, रूक्मीणबाई जाधव, कोमलबाई धुमाळ, संगीता शिंदे, शालिनी चव्हाण, संतोष तिडके, उद्धव चेपट, शोभा ढमाले, साधना जाधव, परमेश्वर वाघमारे, सोनाली थोरमोटे, शीना ढगे, शितल पाटील यांची जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच एन्ट्री होत आहे़
राष्ट्रवादीचे सुभाष पवार, दिलीप नाडे, मंचकराव पाटील, माधव जाधव या चौघांसह शिवसेनेच्या संगीता माने आणि अपक्ष अनिता परगे हे ही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचा कारभार अनुभवणार आहेत़ सर्व सदस्यांना आता सभागृहाची उत्सुकता लागली आहे़